Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

सामाजिक न्याय विभागामार्फत गटई स्टॉलचे एकूण १६ लाभार्थ्यांना वितरण

marathinews24.com 

पुणे – अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांच्या उपजीविकेला बळ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यवरांच्या हस्ते गटई स्टॉलचे एकूण १६ लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.

कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, पुणे येथे आयोजित कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे माजी अध्यक्ष, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, संत रोहिदास समाज उन्नती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजू रतन बनसोड,संत रोहिदास महामंडळाचे विभागीय अधिकारीअमोल शिंदे, गटई स्टॉलचे लाभार्थी उपस्थित होते.

लोंढे म्हणाले, शासनाच्या या उपक्रमामुळे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील लाभार्थींना स्वावलंबनाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस चालना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थींना व्यवसाय सुरू किंवा विस्तार करण्यासाठी आवश्यक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले, असेही लोंढे यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा व लाभार्थ्यांचा सन्मान संविधानाच्या उद्देशिकेची प्रेम व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तदनंतर विशेष अधिकारी श्रीमती माधुरी वाघमोडे मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर लाभार्थी अमोल शिंदे व संजय भाऊ बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र लोहार यांनी केले. आभार प्रदर्शन अमोल शिंदे, व्यवस्थापक चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×