Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

क्रेडिट कार्डद्वारे 11 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक

Medicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूक

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नोकरी संदर्भात मित्राशी चर्चा करत असताना कोणताही ओटीपी शेअर न करता फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून अज्ञात सायबर चोरट्यांनी 11 लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरटीओ चलन एपीके फाईल व एम एन जी एल एपीके फाईल बँक खात्याचे लाभार्थी बँक खातेधारक व वापरकर्ते यांच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश तानाजी माने (वय ५४ वर्षे, रा. एस ९ सन पॅराडाईज फेज २, सनसिटी जवळ, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

जुन्या वादातून तरुणावर हत्याराने जीवघेणा हल्ला – सविस्तर बातमी 

महेश माने हे दि. १८ जूनला त्यांच्या मोबाईलवरून त्यांचा मित्र विनीत गिरकर याच्याशी नोकरी संदर्भात बोलत होते. यादरम्यान फिर्यादी यांनी कोणताही ओटीपी शेअर न करता, आरोपींनी त्यांच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर केला. या कार्डवरून एकूण चौदा ट्रान्झॅक्शन करून तब्बल 11 लाख ६६ हजार २५२ रुपये डेबिट करून आर्थिक फसवणूक केली.

सुरक्षारक्षकाला मारहाण करून मोबाईलची चोरी

मार्केटयार्ड येथील पुष्प हाईट्स बिल्डिंगच्या आवारात आलेल्या काही तरुणांना हटकल्याच्या रागातून इमारतीचे सुरक्षारक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्याशी झटापट करून आठ हजार रुपयांचा मोबाईल जबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गणेश शिंदे (रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड, पुणे) व एका अज्ञातावर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विकास राजकरण मोरिया (वय २५ वर्षे, व्यवसाय- वॉचमन, रा. पुष्प हाईट्स, मार्केटयार्ड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २४ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी विकास मोरिया हे पुष्प हाईट्स बिल्डिंगच्या आवारात कर्तव्यावर असताना, आरोपींना त्यांनी येथे येऊ नका असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी चिडून जाऊन फिर्यादी व त्यांना वाचवण्यासाठी आलेले इम्तियाज अहमद इर्शाद अहमद शहा यांच्याशी झटापट केली. यावेळी आरोपींनी त्यांच्या जवळील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरीने चोरून नेला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×