पालखी मार्गाचे ब्लास्टिंग तंत्रज्ञानाद्वारे रुंदीकरणाचे काम
marathinews24.com
पुणे – आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी गुरुवारी (५ फेब्रुवारी) दिवे घाट सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
पुण्यात ऑपरेशन मुस्कान जोरात, मुलींसह बालकांचा शोध – सविस्तर बातमी
दिवे घाटात नियंत्रित स्फोटाद्वारे (ब्लास्टिंग टेक्नोलाॅजी) रुंदीकरण करण्यात येणार आहे. घाटातील डोंगर रांगा, कपारीत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवे घाट गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. दिवे घाटातून सासवड, तसेच पुण्याकडे जाणाऱ्य वाहनांनी कोंढव्यातील बोपदेव घाटमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी केले आहे. सासवड, पुण्याहून दिवे घाटमार्गे जाणारी एसटी बस, पीएमपी बस सेवा बोपदेव घाटमार्गे वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बोपदेव घाटाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















