टँकर चालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – टँकरच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात घडली. या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. निवृत्ती कोकाटे (वय ६५, रा. पाषाण) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालक बापू नाथा गळवे (वय ५२, रा. लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. प्रथमेश गार्डे (वय २५, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बाजीराव रस्त्यावरील दुकानातून रोकड चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती कोकाटे हे ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक परिसरातील पीएमपी थांब्यावर थांबले होते. त्यावेळी टँकरच्या चाकाखाली सापडून कोकाटे यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.



















