Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बँकेतून बोलत असल्याची बतावणी; ज्येष्ठ महिलेची फसवणूक

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटले

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँकेतून बोलत असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

क्रेडिट कार्डद्वारे 11 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक – सविस्तर बातमी 

तक्रारदार ७४ ज्येष्ठ महिला या एरंडवणे भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या डाॅक्टर आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १० जून रोजी संपर्क साधला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. बँकेकडून तुम्हाला ऑनलाइन बँकिंग सुविधा देण्यात येणार आहे, अशी बतावणी चाेरट्यांनी केली. तुम्ही बँकेत येण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी ऑनलाइन बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देतो, असे सांगून त्यांना एक एपीके फाइल पाठविली. ही फाइल उघडताच चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलचा तांत्रिक ताबा घेतला. चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून दोन लाख ७८ हजार रुपयांची रोकड लांबविली. अलंकार पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

वैमनस्यातून तरुणचा खुनाचा प्रयत्न; दोघे अटकेत

वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांना अटक केली. अभिजित गंगाधर ओव्हाळ (वय ३०, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी हर्ष नाईक (वय २२), अक्षय मणेरे (वय २२, दोघे रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड) यांना अटक करण्यात आली. सनी अविनाश सन्नके (वय २०, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड) याने याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हाळ आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. २५ जून रात्री सव्वादहाच्या सुमारास फिर्यादी सनी आणि त्याचा मावसभाऊ अभिजित हे कोथरूडमधील आशिष गार्डन चौकाजवळ असलेल्या एका मद्य विक्री दुकानात गेले होते. तेथून ते श्रावणधारा सोसायटीकडे दुचाकीवरुन निघाले. आरोपींनी मद्य विक्री दुकानाजवळ अभिजत आणि सनी यांना अडवले. ‘बरा सापडला. तुला आज जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी देऊन त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अभिजित गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×