Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यातील गुंडगिराीचा बिमोड करा

मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

marathinews24.com

पुणे – ‘शहरातील वाढत्या गुन्हेगागी घटनांमुळे शहराच्या नावाला काळीमा लागत आहे. काही जण गुन्हेगारी घटनांशी भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार करत आहे. राजकीय हेतूने प्रेरित आरोप करुन कृपा करून शहराचे नाव बदनाम करू नका. भाजप गुुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही’, असे स्प्षट मत राज्याचे तंत्र आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरुन कोणी पोलिसांवर दबाब टाकत असतील, तर त्यांची गय करु नका. कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करावा’, असे आदेश पाटील यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले.

आमदार महेश लांडगे यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी – सविस्तर बातमी

शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ’कोथरूडमधील गुंड नीलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील, तसेच जैन बोर्डिंग प्रकरणात आमचे नाव जोडून काही जण त्यांची राजकीय फायदा उचलत आहेत. कोणतेही पुरावे नसताना थेट आरोप करणे चुकीचे आह”, असे पाटील यांनी नमूद केले.

पाटील म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष गुन्हेगारी किंवा गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही. एका विचारधारेतून पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करतात. मात्र, कोथरूड गोळीबार प्रकरण, घायवळ परदेशात पसार होणे, त्याला मिळालेले पारपत्र अशा घटनांसाठी आमचा संबंध जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणतेही पुरावे नसताना काही जण आरोप करत आहेत. जैन बोडिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे नाव जोडण्यात आले. पुणे शहराचा विस्ता वाढत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. अशा परिस्थितीत शहराच्या विकासावर चर्चा न करता. केवळ आरोप करुन बदनामीचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारांमुळे पुण्याचे नाव बदनाम होत आहे. अशा प्रकारांमुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे.

’पार्थ पवार यांच्या अमोडिया होल्डिंग्ज कंपनीकडून करण्यात आलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पत्रकारांनी पाटील आणि मोहोळ यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला. शहरातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, असे त्यांनी सांगून पाटील यांनी पार्थ पवार प्रकरणावर भाष्य करणे टाळले. ’कोथरूडमध्ये दोन गटात नुकताच वाद झाला. याप्रकरणात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमधील जातीय तणावांवर पोेलिसांनी लक्ष ठेवावे. असे प्रकार योग्य नाहीत’, असे पाटील यांनी नमूद केले.

गुंडांची बेनामी संपत्ती जप्त करा

‘गुंड टोळ्यांना आर्थिक रसद कशी पुरविली जाते. त्यांना कशा प्रकारे पैसे मिळतात. गुंडांनी केलेेले बेकायदा गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालय (ईडी), प्राप्तीकर विभागाकडून चाैकशी करण्यात यावी. त्यांच्या बेनामी मालमत्त जप्त करण्यात याव्यात, याबाबत पोलिसांनी संबंधित विभागाातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन उपाययोजना कराव्यात’,असे आदेश पाटील यांनी दिले आहेत. ‘शहरातील बांधकाम व्यावसायिकांसोबत पोलिसांनी बैठक आयोजित करावी, तसेच गुंड टोळ्यांच्या म्हाेरक्यांचे त्रास, खंडणी अशा प्रकरणांबाबत बांधकाम व्यावसायिकांना योग्य त्या सूचना द्याव्यात’, असे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×