Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डाॅक्टरांकडे खंडणी मागणारा गुंड गजाआड

डाॅक्टरांकडे खंडणी मागणारा गुंड गजाआड

५८ गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराला केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवडा भागात एका डाॅक्टरांना धमकावून ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली. गुंडाकडून कोयता जप्त करण्यात आला. याप्रकरणी अमोल जीवराज पिल्ले (वय ४६, रा. जयजवाननगर, येरवडा) याला अटक करण्यात आली. याबाबत डाॅक्टरांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी 

तक्रारदार डाॅक्टरांचे जयजवाननगर परिसरात रुग्णालय आहे. पिल्ले याच्याविरुद्ध येरवडा, लक्ष्मीनगर, बंडगार्डन, तसेच कर्नाटकातील यादगीर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार करणे, दहशत माजविणे, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे ५८ गुन्हे दाखल आहेत. ८ जून रोजी सायंकाळी तो डाॅक्टरांकडे गेला. कोयता घेऊन तो थेट दवाखान्यात शिरला. डाॅक्टरांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने कोयता उगारून दवाखान्यासमोर दहशत माजविली. या घटनेनंतर घाबरलेल्या डाॅक्टरांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

आराेपी पिल्ले हा तेथून पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो येरवडा भागात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी राहुल परदेशी आणि अक्षय शिंदे यांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक आयुक्त सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गित्ते, सहायक निरीक्षक निखील पवार, सहायक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, पोलीस कर्मचारी यशवंत खंदारे, श्रीनाथ कांबळे, अतुल जाधव, भीमराव कांबळे, सूरज ओंबासे, कादिर शेख यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×