संपूर्ण गावांमध्ये कॅडल मार्चची रॅली काढून केला न्यायव्यवस्थेचा जाहीर निषेध
marathinews24.com
बीड : अनंत जाधव – मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणाने राज्यासह देश हादरला होता. दि.९ डिसेंबर मंगळवार रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे.अद्याप ही या हत्याकांडातील एक आरोपी कृष्णा आंधळे नावाचा फरार आहे तो आरोपी पोलीस प्रशासनाला सापडत नाही याचे दुर्दैव आहे.
पुण्यात न्यायालयाने आरोपींना दिली अनोखी शिक्षा – सविस्तर बातमी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दि. ९ डिसेंबर रोजी दिवंगत संतोष देशमुख यांच्या आईची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या आईने जरांगे पाटील यांच्यासमोर हंबरडा फोडला. फडणवीस साहेब सांगा आई आणि लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा. आम्हाला न्याय कधी मिळणार म्हणत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायसा मिळाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. संतोष देशमुख यांना अभिवादन करुन देशमुख कुटुंबीयांना धीर देण्यासाठी जरांगे पाटील मस्साजोगमध्ये गेले होते. यावेळी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या आईला आणि पत्नीला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या आईने उपस्थित करत हंबरडा फोडला. फडणवीस साहेब सांगा आईने भावाने लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा. सून घेऊन बसले लेकरं इकडे तिकडे पाठवले आता मी करायचं काय? असा सवाल देखील संतोष देशमुख यांच्या आईने केला. सीआयडी आहे म्हणतेत मग तपास का होत नाही. तुम्हाला वेळ का लागतो? का आम्हालाच काहीतरी करायचे असे सरकारने ठरवलंय का? आम्हाला सरकारने उत्तर द्यावं. लेकरं कुठेतरी ठेवलेत याचं सरकारने काहीतरी बघावं लागेल. धनु सोबत कोणीतरी पाहिजे आणि आम्हाला देखील पोलीस संरक्षण पाहिजे, अशी मागणी देखील संतोष देशमुख यांच्या आईने केली आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले, त्यावेळी वाटलं होतं की वर्ष उजाडणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी तशा वल्गना केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचा त्या दिवशी हा शब्द होता. एक वर्षात का होईना सर्वजन फासावर लटकतील असं वाटलं होतं. अजित दादांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्याच्या नुसार यंत्रणा सुरू आहे का? सरकार तर त्याला मार्गदर्शन करत नाही ना असा संशय.. मुंबईत आमची देशमुख प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. परळीवाल्याने लोकांमध्ये पेरून ठेवलंय की आपला माणूस सुटणार असं म्हणा. परळीतुन तो असे काम करतोय.
लोकांमध्ये चर्चा झाली आहे. जर तो सुटला तर बीड जिल्हा आणि महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवला जाणार. आरोपीचं कुटुंब त्याच्या विरोधात जाणार असल्याची माहिती. म्हणून असं बोलतायत. परळीच्या नेत्यासाठी हे केलं.. हे धन्यानीच घडवून आणलंय हे कुटुंब एक दिवस म्हणणार आहे. हा कितीही म्हणाला सुटणार आहे तरीही तो जेलमध्येच सोडणार आहे. सुटला तर त्यादिवशी महाराष्ट्रात चाक सुध्दा फिरणार नाही.
देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुटुंबाला शब्द दिलेला आहे. पुढचे आंदोलनं थांबवले फडणवीस साहेबांच्या म्हणण्यानुसार. सरकार दबाव तर आणत नाही ना, तो आरोपी बिना बापाचा कुठे गेलाय. तुमच्यासाठी परळीवाला महत्वाचा आहे का?.. आरोपी पकडला तर खुप मोठा उलगडा होणार आहे. हि घटना गांभीर्याने घेऊन सर्व आमदार, मंत्र्यांनी न्याय देण्याचं काम करावं. 4-5 महिन्यात तरी करावा.. नाहीतर मस्साजोगने हाक दिली तर आम्ही मागे पुढे बघणार नाही. अजित दादाला तोच लागतोय का?.. क्रुर लोकांना सोबत घेतल्यावर आम्हाला राग येणारच.
अजित दादा आणि फडणवीस.. परळीवाल्याची बैठक झाली
विकास कामाच्या बैठकीसाठी पोलीस महासंचालकांची गरज काय.. आतमध्ये काहीतरी शिजवीत आहेत. माझ्या घातपाताच्या प्रकरणात गुप्त SIT गठीत करण्यात आली म्हणला.आणि त्याचं शुध्दीकरण करण्यात आलं.. कारण वर्षावर बाप्पा बसलेलाच आहे.इकडं येताना त्यांनी दादा शब्द घेऊन आले नाहीत. अजित पवार घेऊन आले. पिकविम्याचा भ्रष्टाचार करतेत, खंडण्या गोळा करतेत, बीडमध्ये 50 वर्षाच्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, जिल्ह्यातलं सगळं वातावरण त्याच्याच हाताने हाताळायचंय का? घातपाताचा विषय सत्य आहे.
फरार आरोपी अटक करा..निलंबित केलेल्या पोलिसांना अटक करावी. त्याला देखील यामध्ये आरोपी करा धनंजय मुंडे यांना
4 महिने थांबु नंतर आम्ही रस्त्यावर उतरणार.
8 दिवसात राज्याची मस्साजोगमध्ये बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार
पुर्वीचा देवेंद्र फडणवीस व्हावा म्हणजे न्याय मिळेल नाहीतर.. अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरणार. प्रत्येक प्रकरणात कुटुंबावर दबाव आणायचं काम केलेलं आहे. याच्या संपत्तीवर जप्ती कशी काय येत नाही. याचा अर्थ सरकार त्यांच्या पाठीशी.इथलं पोलीस अधीक्षक कार्यालय ॲक्टिव्ह नाही का दुसऱ्या राज्यात आहे.गृह मंत्रालय संपतीवर जप्ती आणु शकतात.फडणवीस साहेबांनी तात्काळ जप्ती आणावी.
धनंजय मुंडेकडं यांचे काही व्हिडिओ आहेत वाटतं म्हणून दिसतायत. बायाच्या वाचाचं आहे. तुझ्यात दम असेल तर चल नार्को टेस्टला,
दशहत माजवली तर सोडणार नाही. देशमुख प्रकरणात जेलमध्ये घालणार. चार महिन्याच्या आत फाशी द्या हा वेळ कुटुंब नाही आम्ही देतोय. नाहीतर रोषाला सामोरे जायला तयार राहा.जात पुढे करतात.. पाप तु करणार आणि त्यांना कशाला ओढतो. टार्गेट केलं म्हणतो. तुला संतोष देशमुख खून प्रकरणाच्या अगोदर टार्गेट का केलं नाही ते सांग असेही जरांगे यावेळी बोलत होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण, या प्रकरणी विधानसभेत निवेदन दिले जावे, धनंजय देशमुखांची मागणी आहे धनंजय देशमुख पुढे बोलताना म्हणाले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असून ९ डिसेंबर रोजी मस्साजोग येथे काळा दिवस पाळला आहे. इतकच नाही तर प्रत्येक वर्षी 9 डिसेंबर हा काळा दिवस म्हणून असेल. त्याचबरोबर सरपंच देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत निवेदन दिले जावे, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. आमचा निष्पाप माणुस गेला आहे. त्यामुळे ९ तारखेला मस्साजोगमध्ये काळा दिवस पाळण्यात आला . ९ डिसेंबर रोजी संपूर्ण गावांमध्ये कॅडल मार्च काढून गुन्हेगारांचा जाहीर निषेध गावकऱ्यांकडून केला आहे. ९ डिसेंबर मस्साजोगसाठी कायमचा काळा दिवस असेल, असं आज आम्ही जाहीर करणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. पुढे बोलताना धनंजय म्हणाले राजकीय आश्रय असल्याने न्यायासाठी प्रकरणाला उशीर होतोय, आमची काही चूक नसताना आमचा माणूस कायमचा हिरावला आहे, त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना भेटणार आहे. या प्रकरणात राजकीय आश्रय असल्याने प्रकरणात न्यायासाठी उशीर होत आहे.
राजकीय हस्तांतरण असले तर या प्रकरणात वेळोवेळी सिद्ध झाला आहे. दोन नंबरच्या आरोपीच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी केज आणि बीडच्या कोर्टात आढळून आल्याचे व्हिडिओ देखील आम्ही प्रशासनाला दिले आहेत. याच्यामागे पूर्ण राजकीय ताकद वापरली जात आहे, याचा गांभीर विचार केला गेला पाहिजे. असेही धनंजय देशमुख म्हणाले. याचा विचार मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे,दरम्यान, या संदर्भात निवेदन अधिवेशनात दिले गेले पाहिजे. यांचा कायमचा बंदोबस्त कसा करता येईल, यावर त्यांनी बोललं पाहिजे. हायकोर्टात काही आरोपींकडून अर्ज केला गेलाय, त्याच्यावर आम्ही आमचे शपथपत्र दिले आहेत.
त्याची तारीख 12 डिसेंबरला आहे त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाला कसा धोका आहे हे आम्ही सांगितलं आहे. कृष्णा आंधळेच्या तपासाचा तीन महिन्याचा अहवाल न्यायालयाने एसआयटी आणि सीआयडीला मागितली आहे. अधिवेशनामध्ये फरार आरोपींना ज्यांनी आश्रय दिला त्यांनी गाड्या पुरवल्या. त्या लोकांना वेगळ्या कायद्याखाली अटक झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजेचे निवेदन होणे गरजेचे असल्याची माझी मागणी असणार आहे. असेही धनंजय देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलतांनी म्हणाले. बाळा बांगर प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालंय केस मध्ये गती दिसत नाही. कृष्ण आंधळे आजुन सापडला नाही यंत्रणेवर संशय निर्माण होतोय, यंत्रणेवर विश्वास आहे तरीही संशय निर्माण होतोय देशमुखांचे विचार जिवंत आहेत. 12 डिसेंबरला चार्ज फ्रेम होणार आहे, पुढच्या 9 डिसेंबर पर्यंत आरोपी फाशी जातील अशी आमची अपेक्षा आहे. आरोपी जेरबंद असला तरी, एक पोलिस अधिकारी वाल्मिकची सगळी यंत्रणा बघतात तत्कालीन बीड पोलिस एलसीबीचे पीआय त्याचं काम पाहतायत अधिकाऱ्यांची नावं लवकरच सांगू अधिवेशनात काही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलणार आहेत.
यंत्रणेतील लोक अधीक्षकांना चुकीची माहिती देतात ही संस्थात्मक हत्या आहे, यंत्रणा, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही देशमुख कुटुंबीयांसोबत आहोत ज्या माणसात हृदय आहे ते या हत्येचं समर्थन करणार नाही.
























