पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १८ ठिकाणी आग

फटाके वाजवताना काळजी घेण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी पाचनंतर शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री नऊपर्यंत १८ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

पुणेकरांनो दिवाळीत वेग मर्यादेचे पालन करा – सविस्तर बातमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे हडपसर भागातील पंधरा नंबर भागात आग लागली. तर वारजे भागातील चौधरी दत्त मंदिर परिसरात एका दुकानात आग लागली. नऱ्हे गावात इमारतीच्या गच्चीवर आग लागली. हडपसरमधील काळेपडळ भागात एका इमारतीच्या गच्चीवर आग लागली. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्री दत्त मंदिराजवळ इमारतीतील गच्चीवर आग लागली. कसबा पेठेतील कागदीपुरा भागात एका इमारतीतील चौथ्या मजल्यावर आग लागली.

विमाननगरमधील संजय पार्क भागात नारळाच्या झाडावर पेटता फटका पडल्याने आग लागली. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाजवळ एका इमारतीत, नगर रस्त्यावर वडगाव शेरी भागात एका दुचाकीला आग लागली. धानोरीतील कलवड वस्ती भागात कचऱ्याला आग लागली.

कसबा पेठेतील कागदीपुरा भागातील नागझरीत साचलेल्या कचरऱ्याला रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. शुक्रवार पेठेतील फडगेट पोलीस चौकीसमाोर एका घराच्या छतावार साचलेल्या पाला पाचोळ्याने पेट घेतला. घोरपडे पेठ, विमाननगर, गणेश पेठेतील डुल्या मारुती मंदिराजवळ एका इमारतीत आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

फटाके वाजविताना काळजी घ्या

फटाके वाजविताना नागरिकांनी काळजी घ्यावी. फटाके बंदिस्त जागे वाजवू नयेत. ज्वलनशील पदार्थांच्या परिसरात फटाके पेटवू नयेत. फटाके वाजविणाऱ्या लहान मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×