शार्ट सर्किटमुळे बंगल्यात लागली आग

शार्ट सर्किटमुळे बंगल्यात लागली आग

घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात घटना

marathinews24.com

पुणे – बंगल्यातील शयनगृहात शाॅर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी बंगल्यात अडकलेल्या आठ जणांची सुखरुप सुटका केली.

गणेश विसर्जन सोहळ्यात ट्रॅक्टर ट्राॅलीच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी – सविस्तर बातमी 

बी. टी. कवडे रस्त्यावरील उदयबाग परिसरात एका बंगल्यात (रो हाऊस) बुधवारी मध्यरात्री आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

बंगल्यातील खिडक्यांचे गज तोडून जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. बंगल्यात आठ जण होते. मोठ्या प्रमणावर धूर झाल्याने घाबरले होते. जवानांनी आठ जणांची सुटका केली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अग्निशमन दलातील अधिकारी निलेश लोणकर, जवान सुभाष खाडे, श्रेयस मोटे, महेश पांडे, बापू राऊत, अडागळे यांनी आग आटोक्यात आणली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×