पुण्यात ३० ठिकाणी आगीच्या घटना

३ आगीच्या घटना फटक्‍यामुळे

marathinews24.com

पुणे – शहरात ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मंगळवार (दि.२१) दुपारीपर्यंत ३० हून अधिक ठिकाणी आगीच्‍या घटना घडल्‍या. त्‍यातील तीन आगीच्‍या घटना फटाक्‍यामुळे तर उर्वतीत आगीच्‍या घटनांचे कारण समजु शकले नसल्‍याचे अग्निशमन दलाच्‍या वतीने सांगण्यात आले आहे.

भरदिवसा घरफोडी करणार्‍या सराईताला अटक – सविस्तर बातमी

गॅलरीत फटाका रॉकेट पडून फुरसुंगीतील इमारातील आग लागल्‍याची घटना घडली. तर खराडीतील गेरा सोसायटीत फटाका पडून मोठ्या प्रमाणावर कचरा पेटला, तर हडपसर येथील रेल्‍वेमार्गालगत गवताना आग लागल्‍याच्‍या घटना बरोबर तत्‍पुर्वी गणेश पेठेतील डुल्‍या मारून मंदिराजवळ चंद्रकांत शहा आणि कंपनी येथे ऑफीस आणि ग्राईंडींगचे साहित्‍य होते. त्‍याच गोदामाला आग लागली. त्याठिकाणी दोन फायर गाड्या ब्राऊजर, देवदुत अशी अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती.

सोमवारी दुपारपासून ते पहाटेपर्यंत २५ आगीच्‍या घटना घडल्‍या. कात्रज आंबेगाव पठार येथे कचऱ्याला आग, येरवडा कारागृहासमोर कचऱ्याला आग, मार्केटयार्ड येथील बैठबाजारला आग, कात्रज भारती विद्यापीठ त्रिमुती चौकातील झाडला आग, धानोरी मुंजोबा वस्‍ती, नेताजी स्‍कुले यथे आग, धानोरी येथील स्‍काईराईज येथे कारवाई, कोंढवा रोड, माऊलीनगर, कोरेगापार्ग , हडपसर मुंडे वस्‍ती याठिकाणी आग लागली होती.

शहरातील मध्यवर्ती शनिवारवाडा येथील अहिल्‍यादेवी शाळेजवळ, औंध येथील शिवाजी हौसींग सोसायटी, येथे टेकडीवर, भवानी पेठेतील गोकुळ वस्‍ताद तालीम, बावधन येथील डील पॅलेस हॉटेल, नानापेठेतील क्‍वार्टरगेंट. लोहगाव येथील लेन नंबर १८ खेसेपार्क येथे, शुक्रवार पेठे जैन मंदिरा मागे, गुजरवाडी रोड, हांडेवाडी येथील धनश्री आशियाना सोसायटी, खराडीतील गेरा पार्क सोसायटी, टिंगरेनगर गल्‍ली नंबर ११, बाणेर येथील पॅनकार्ड क्‍लब येथील डोंगरावरील गवताला आग लागली अशा असख्य ठिकाणी आगीच्‍या घटना झाल्‍याची नोंद अग्निशमन दलाने केली. घटनास्‍थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×