प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण

फुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना धमकाविण्यात आले. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहण केल्याची घटना बाणेर परिसरात घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, रा. धनशीला बंगला, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून; मृतदेह नाल्यात टाकला – सविस्तर बातमी 

प्रणित प्रमोद निम्हण, प्रणय प्रमोद निम्हण, प्रसन्न रामभाऊ निम्हण, संदीप नामदेव निम्हण, परवेज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी धनकुडे यांची नणंद सरला बाबुराव चांदेरे यांचे पती बाणेरमधून निवडणूक लढवित आहेत. धनकुडे कुटुंबीयांनी चांदेरे यांना पाठिंबा दिला होता. चांदेरे यांना पाठिंबा दिल्याने निम्हण कुटुंबीय चिडले होते. गुरुवारी (१५ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणी बंगल्याच्या परिसरात थांबल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना आरोपी निम्हण हे धनकुडे यांच्या बंगल्यात शिरले. धनकुडे यांचा मोटारीवरील चालक सचिन उत्तम फासगे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत फासगे जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी कल्याणी यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. कल्याणी यांना वाचविण्यासाठी आलेले नवनाथ देशमुख यांना काठी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

कल्याणी यांची नातेवाईक सायली निलेश शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी तिला धक्काबुक्की केली, तसेच आरोपी प्रणित निम्हण याने ‘निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला बघून घेतो’, अशी धमकी दिली, असे कल्याणी धनकुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कल्याणी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा गर्दी, मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×