Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यातील संगमवाडीत टोळक्याचा राडा

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटले

हवेत शस्त्रास्त्रे फिरवली ६ जणांना अटक

marathinews24.com

पुणे – टोळक्याने हवेत शस्त्रास्त्रे फिरवत दहशत माजवल्याची घटना २ फेबु्रवारीला रात्री पावणेदहाच्या सुमारास संगमवाडी परिसरात घडली आहे. टोळक्याने आरडा ओरड करीत परिसरात शांततेचा भंग केला. एकमेकांना मारहाण करीत प्रतिबंधक आदेशाचा भंग केला आहे. याप्रकरणी सहाजणांना लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

गुंतवणूकीच्या आमिषाने महिलेची १७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

अथर्व रवींद्र सोरटे (वय १९ रा. सोरटे चाळ, संगमवाडी) सिद्धार्थ रवींद्र सोरटे (वय २४) सौरभ समाधान शिंदे (वय २० रा. संगमवाडी) आयुष अनिल जाधव (वय २०, रा. उत्तमनगर, वारजे) ओम उर्फ शंभुराज ज्ञानेश्वर फुगे (वय २४ रा. संगमवाडी) सार्थक सुनील सोरटे (वय १९, रा. संगमवाडी गावठाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अमलदार अमोल वायाळ यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळक्याने संगणमत करून २ फेबु्रवारीला रात्री साडेनउच्या सुमारास गर्दी जमवली होती. त्यानंतर त्यांनी लोखंडी शस्त्रास्त्रे हवेत फिरवून आरडा-ओरड केली. एकमेकांना मारहाण करीत परिसरात दहशत निर्माण केली. आरडाओरड, मारहाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले होते. प्रकरणाची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलिसांनी धाव घेत आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक उमेश गित्ते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×