Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

लूटमारीच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

लूटमारीच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून केली अटक

maratinews24.com

पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या चाेरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केली. दरी पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. समीर नामदेव काळे (वय १९ ), निवृत्ती संजय जाधव (वय २०), पियूष अमोल जगताप (वय १९), सिद्धेश गणेश फाटक (वय २०), निखिल रामचंद्र खुटवड (वय २०), साहिल एकनाथ मळेकर (वय १९, सर्व रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस शिपाई ओंकार जगताप यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जीन पँट परिधान केल्याने महिलेला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे, जाधव, जगताप, फाटक, खुटवड, मळेकर आणि त्यांच्याबरोबर असलेला एक अल्पवयीन साथीदार मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील दरीपूल परिसरात शनिवारी (३ जानेवारी) दुपारी पावणेचारच्या सुमारास थांबले होते. आरोपी लूटमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×