Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

जीन पँट परिधान केल्याने महिलेला बेदम मारहाण

सासूसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – जीन पँट परिधान केल्याने एका महिलेला सासूसह नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना पद्मावती भागातील तळजाई वसाहतीत घडली. याप्रकरणी सासूसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ३३ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सासू, दिरासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला चार मुले आहेत. तिच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर महिला कचरा वेचून उदरनिर्वाह करते. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी महिलेने जीन पँट परिधान केली. त्यावेळी महिलेची मुलगी तेथे होती. काही वेळानंतर सासू तेथे आली. सुनेने जीन पँट परिधान केल्याचे पाहताच सासूने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जीन पंट परिधान केल्याने सासूने तिच्या चारित्र्याचा संशय घेतला. सासूने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असताना महिलेची मोठी मुलगी तेथे आली. तिने भांडणात मध्यस्थी करण्याऐवजी आईला मारहाण केली.

मारहाणीत महिला जमिनीवर पडली. दिराने तिला मारहाण केली. मारहाणीत तिचा हात फ्रॅक्चर झाला. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. महिलेची सासू, तिची विवाहित मुलगी, दिराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×