Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटला

आडोशी बोगद्याजवळ १५ तास वाहतूक ठप्प

marathinews24.com

पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची गंभीर घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १५ तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पैशामुळे लग्नात बदनामी होईल म्हणून जिवलग मित्राचा काढला काटा – सविस्तर बातमी

टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना आडोशी बोगद्याजवळील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळच टँकर उलटल्याने मोठा अपघात टळला असला, तरी गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टँकरमध्ये प्रोपलेन हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाययोजना सुरू केल्या. संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ रोखण्यात आली असून, पुण्याकडील वाहतूकही नियंत्रित करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा तसेच हेल्प फाऊंडेशनची आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले असून, गॅस गळतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गॅस गळती रोखण्यासाठी विशेष तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले असून, परिस्थिती पूर्णतः सुरक्षित झाल्याशिवाय वाहतूक सुरू केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. खबरदारी म्हणून आडोशी बोगदा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे

द्रुतगती मार्गावर आडोशी मार्गावर टँकर उलटून गॅस गळती झाल्यानंतर द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातानंतर वाहनचालकांनी पर्याीय मार्गांचा वापर करावा. वाहनचालकांनी लोणावळा, खंडाळा मार्गे जाणे टाळावे. वाहनात पुरेेसे इंधन भरावे. अन्नपदार्थ, पाणी बरोबर ठेवावेत, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी केले आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे – ताम्हिणी घाट मार्ग- पुणे – पौड, ताम्हिणी घाट – माणगाव – मुंबई (दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी उपयुक्त), माळशेज घाट मार्ग – पुणे – चाकण – नारायणगाव – माळशेज घाट – कल्याण – ठाणे (उपनगरांसाठी उपयुक्त)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×