Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सहायक संचालक, पुणे यांच्या अधिपत्याखालील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 17 ऑगस्ट 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक प्रदीप संकपाळ यांनी केले आहे.

पुणे ठरले देशातील सर्वाधिक घरे विक्री होणारे शहर – सविस्तर बातमी 

जिल्ह्यातील उच्च व तंत्र शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. विभागांतर्गत जिल्ह्यात मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. या विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाही राबविण्यात येत असून इच्छुकांनी अर्ज करावेत, असेही कळविण्यात आले आहे.

१२ वी उत्तीर्ण होऊन त्यानंतर कला, वाणिज्य, विज्ञान अशा पदवी अभ्यासक्रमांमध्ये किंवा पदव्युत्तर पदवी (एम.ए., एम.एससी.) (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास सुविधा, दरमहा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्यासाठी भोजनभत्ता, गणवेश ड्रेसकोड रक्कम आदी सुविधा शासनामार्फत विनामूल्य पुरविल्या जातील. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृह किंवा प्रदीप संकपाळ, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स.नं. १०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×