Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला अंगारकीनिमित्त भव्य पारंपरिक पुष्पआरास

नववार्षातील पहिली अंगारकी चतुर्थी : भाविकांची पहाटेपासून अलोट गर्दी

marathinews24.com

पुणे – ओम् गं गणपतये नम :…गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… मंगलमूर्ती मोरया… अशा गणेश नामाच्या जयघोषाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नववर्षातील पहिला अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले होते.

खेलो इंडिया बीच कबड्डीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी – सविस्तर बातमी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक, श्री गणेशयाग देखील मंदिरात पार पडला. याशिवाय श्रीं च्या मंगलआरती भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली.

मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरिता झेंडू, गुलाब, शेवंती आदी फुले वापरुन पारंपरिक सजावट करण्यात आली होती. तर, सभामंडपात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. मंगळवारी पहाटेपासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढे पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×