Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - विशेष लेख

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात ही कारवाई करण्यात आली. दिनेश सुरेश ढोरे (वय ३८, रा. शिव काॅलनी, आंबेगाव पठार, धनकवडी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वारगेट परिसरात ज्येष्ठ नागरिकाला पाईपने मारहाण – सविस्तर बातमी 

ढोरे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो आंबेगाव पठार परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दाेनमधील पोलीस कर्मचारी शिवानंद कायगुडे आणि उज्ज्वल मोकाशी यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, सर्जेराव सगर, संतोष टकले, शंकर नेवसे, शंकर कुंभार, नागनाथ राख, विजयकुमार पवार, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.

मित्राकडून ६ लाखांचे दागिने चोरी

मित्राने तरुणीच्या सदनिकेतून सहा लाख २४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी तरुणाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली आहे. तरुणीच्या सदनिकेतून मित्राने दागिने चोरल्याचा संशय तिने फिर्यादीत व्यक्त केला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कोंढव्यातील एका सोसायटीत राहायला आहे. आरोपी तरुण हा तिचा मित्र आहे. तरुणाची मावशी याच सोसायटीत राहायला आहे. २५ जून रोजी तो मावशीला डबा द्यायला होता. तेव्हा तो तरुणीच्या घरात गेला होता. तरुणीचे लक्ष नसल्याचे संधी साधून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेला, असा आरोप तिने फिर्यादीत केला आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक आनंद थिटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×