Breking News
राज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावाडिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्यायभिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणारनिर्यातीच्या आमिषाने ४ कोटी ३२ लाखांची फसवणूक

ओबीसींच्या मुळावर उठला तर कोणीही असो त्याला आडवे करा – मंत्री छगन भुजबळ

ओबीसींच्या मुळावर उठला तर कोणीही असो त्याला आडवे करा' - ना. छगन भुजबळ

भुजबळ आणि धनंजय मुंडेंची मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका

marathinews24.com

बीड : अनंत जाधव – महाराष्ट्रातील बीड हे कुठल्या न कुठल्या कारणांमुळे सतत चर्चेत असते बीड मधे ओबीसी आरक्षण महाएल्गार मेळाव्याचे आयोजन दिनांक १७ ॲाक्टोबर शुक्रवार रोजी सांयकाळी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे करण्यात आले होते. या महामेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने ओबीसी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी समर्थक उपस्थित होते.

पुणेकरांच्या उपस्थितीत पर्वतीवर उत्साहात दीपोत्सव साजरा – सविस्तर बातमी 

या मेळाव्याचे निमंत्रण असताना सुद्धा पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. या मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे गैरहजर राहिल्याने पंकजाताई भुजबळ यांच्या वर नाराज आहेत का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये चर्चेला उधाण आले आहे. ओबीसी बांधवांशी संवाद साधतांना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकेचा निशाणा साधत ओबीसी आरक्षणाबाबतही ठामपणे भूमिका मांडली. भाषणाच्या सुरुवातीस उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ म्हणाले, राज्यात अतिवृष्टी झालेली असतानाही तुम्ही सगळे ओबीसींची वज्रमूठ दाखवण्यासाठी आलात त्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम धन्यावाद. यानंतर भुजबळ असंही म्हणाले, की दिवाळीच्या शुभेच्छा मी तुम्हाला कशा देऊ? ओबीसींच्या आरक्षणासाठी आत्तापर्यंत १५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत, आपण कशी दिवाळी साजरी करावी? तसेच, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी आरक्षण आहे. असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

जे जे ओबीसी समाजाच्या मुळावर उठले असतील ते कोणत्याही समाजाचे नेते असू दे त्यांना आडवे करा असे तुम्हाला मी सांगतो, आम्ही जरांगे या दरिद्रेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता, विरोधी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यांनी मला फोन केला आम्ही जरांगेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्या वर टीका करता, आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातात तेव्हा तुम्ही का गप्प बसतात… मला त्यांना सांगायचय आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, आणि गप्प बसणार नाही. तो विखे कसाकाय आला, विखे आला अन् संपूर्ण महाराष्ट्रात विखार पसरून गेला, एक दिवस असा येईल आमचा हा गोर गरीब ओबीसी भटक्या विमुक्त हा सुद्धा टाळखीत बसेल आणि तुम्हाला सतरांज्या उचलायला लावल्या शिवाय राहणार नाही, असा भाजप सरकार वर निशाना साधत पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, फक्त देवेंद्र फडणवीसला काढा… अरे तुम्हीचतर मागे होतात ना… मराठा समाजाला आरक्षण द्या, परत म्हणता  ‘देवेंद्र फडणवीस’ ला काढा तुमचं राजकारण आहे, ज्यांनी हे दिलं सगळं ते केलं ते विखेंच नाव घ्याना ते नाही… त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावतंय असं या महाएल्गार सभेत भुजबळ बोलत होते.

धनंजय मुंडे ओबीसी आरक्षण महाएल्गार मेळाव्यात संबोधित करताना आमदार मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. मुंडे म्हणाले आपला विरोध मराठा समाजाला नाही, तर एका व्यक्तीला आणि एका प्रवृत्तीला आहे, असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंचं नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे म्हणाले की, आज मी इथे उभाय तो माझ्या ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. मला कोणत्याही समाजाला विरोध करायचा नाही. भुजबळ साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी एक खंत व्यक्त केलीय. परंतु स्व. मुंडे साहेब आज हयात असते तर ही वेळ आली नसती. त्यांची बरोबरी कोणी करु शकत नाही. “दोन वर्षांपासून केवळ एका व्यक्तीने, एका प्रवृत्तीने ओबीसी-एससी, एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं. ते अंतर कुठून पडलं? मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की, हा माणूस तुमच्याशी दगाफटका करतोय. मराठा समाजाचा खरा फायदा हा ओबीसीत येऊन नाही तर ईडब्ल्यूएसमध्ये आहे. मूठभर लोकांना राजकारणात आरक्षण घ्यायचं आहे, त्यामुळे ओबीसीत येण्याचा अट्टाहास घातला जातोय.” असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आणि परत एकदा एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा कटऑफ किती लागतो ते सांगितला. मनोज जरांगे यांचं नाव न घेता धनंजय मुंडे म्हणाले, मला तर कधीपासून पाडीतोय म्हणतोय. भुजबळ साहेबांनाही पाडीतोच म्हणतोय. अरे मी १ लाख ४२ हजारांच्या मताने निवडून आलोय. आज ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये, त्यासाठी हा न्याय्य लढा आहे. या व्यक्तीने माणसात माणूस ठेवला नाही. कशाला त्या बिनडोकाच्या नादी लागता.

“आमचं तर सारं घरदार काढलं.. इंग्रजांपर्यंत काढलं. माझा तर डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, ऑपरेशननंतर फडफडतो. अजून फडफडू नये म्हणून चष्मा घातलाय. माझ्या चष्याचीही अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्म्यावाला.. आवडला तर घेऊन जा, पण वपून दिसेल की नाही मला माहिती नाही. वपून म्हणजे कळालं ना? आपली ही भाषा आहे. त्यामुळे आपणच लई वाचाळ आहोत, असं समजाच्चां कारण नाही.” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी कुणाला घाबरायचं नाही, कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायच, असं आवाहन उपस्थितांना केलं. या मेळाव्यास उपस्थित आमदार धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर , लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे यांच्या सह समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा ओबीसी मेळावा पार पडला .

भुजबळांनी या मेळाव्याला अनुपस्थित राहिलेल्या नेत्यांना शेरोशायरीतून सुनावलं-

मंचावर येताच छगन भुजबळ यांनी मंचावर कोण उपस्थित आहे कोण अनुपस्थित आहे ते पाहिले या मधे मंत्री पंकजाताई मुंडे गैरहजर असल्याचे त्यांना दिसून आले. आणि माईक जवळ येताच त्यांनी नाराज असलेल्या किंवा या मेळाव्याला न येणाऱ्या नेत्यांना शेरोशायरीतून सुनावलं. भुजबळ म्हणाले, अधिकार की लढाई में निमंत्रण नहीं भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आते हैं… हमारे हक पर आच आए तो टकराना जरुरी हैं, तुम जिंदा हो तो जिंदा नजर आणा जरुरी है.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×