पिस्तुले बाळगणार्‍या सराईताला बेड्या

पिस्तुले बाळगणार्‍या सराईताला बेड्या

वारजे पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – बेकायदेशिररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी सराईताला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यश विनय शहा (वय २५, रा. देशपांडे गार्डन सोसायटी, नर्‍हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई जी. डी. शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

दहशतीसाठी पिस्तूल बाळगणार्‍याला अटक – सविस्तर बातमी 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वारजे माळवाडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत होते. गणेशोत्सवात गंभीर गुन्हे घडू नये यानिमित्ताने पोलिस गस्त घालत असताना पोलिस अमंलदार गणेश शिंदे आणि सत्यजीत लोंढे यांना सराईत आरोपीची माहिती मिळाली. त्याने भारती विद्यापीठ, सिंहगड रोड परिसरात गंभीर गुन्हे केले आहेत. तो वारजे परिसरात फिरत आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक संजय नरळे यांना सापळा रचला.

पोलिसांनी कात्रजकडे जाणार्‍या मजुर अड्ड्याशेजारी आरोपी यश शहा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी नंतर त्याने आणखी एक पिस्तुल पोलिसांना काढुन दिले. ही कारवाई पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पेालिस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, निलेश बडाख, योगेश वाघ, बालाजी काटे, सागर कुंभार, शरद पोळ, निखील तांगडे, अमित शेलार, अमित जाधव, महादेव शिंदे, अमोल सुतकर यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×