Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

दगडाने ठेचून मित्राचा खून करणाऱ्या सराईतांना अटक

दगडाने ठेचून मित्राचा खून करणाऱ्या सराईतांना अटक

वाघोली पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – गप्पा मारत असताना झालेल्या बाचाबाचीतून मित्राचा दगडाने ठेचल्यानंतर हत्याराने वार करून खून करणाऱ्या तीन सराइतांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय बाबु पटेल ( वय २४ , रा. लेन नं १२ आपले घर सोसायटी, खराडी) मयुर रामकिसन वडमारे ( वय २२, रा. खुळेवाडी, चंदननगर) प्रदीप रघुनाथ जाधव (वय २३, रा. लेन नं ८ आपले घर सोसायटी, खराडी) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. बादल शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

न्यायालयाने शिक्षा सुनावली अन सराईत पळून गेला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादल शेख आणि त्याचे मित्र रविवारी (दि. ५) पहाटे सव्वा चारच्या सुमारास उबाळेनगरातील लॉजच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याने रागातून अक्षय पटेल, मयुर वडमारे व प्रदीप जाधव यांनी बादल शेख याला दगडाने मारहाण केली. धारधार हत्याराने वार कर त्याचा खून करून तिघेही पसार झाले. वाघोली पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू होता.

पोलीस अंमलदार प्रदिप मोटे यांना आरोपी खराडी व दापोडीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे, तपास पथक पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×