Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात मेफेड्रॉनची तस्करी करणाऱ्या सराईतांना अटक

पुण्यात मेफेड्रॉनची तस्करी करणाऱ्या सराईतांना अटक

७ लाख ५२ हजारांचे एमडी, ५ मोबाइल, दोन दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – पोलिसांनी विशेष मोहिम राबवून अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः उपनगरात राहणार्‍या परदेशी तस्कर आणि छुप्या पद्धतीने एमडी, गांजासह इतर अमली पदार्थांचे रॅकेट चालवणार्‍याविरूद्ध बारीक नजर ठेउन कारवाई केली जात आहे. पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद थांबलेल्या चौघा सराईतांना ताब्यात घेउन गुन्हे शाखेने मेफेड्रॉन विक्रीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करीत त्यांच्याकडून साडेसात लाखांचा ३७.६० ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी) पाच मोबाइल, दोन दुचाकी असा ९ लाख ३७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

जुन्या भांडणातून दोन्ही कुटूंबियांनी केली एकमेकांना मारहाण – सविस्तर बातमी 

मतीन हुसेन मेमन (वय २५ रा. स.नं ४२ हादीया हाईटस, फ्लॅट नं ७०, कोंढवा ) फैजल नैशाद मोमीन (वय २६ रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द ) फैयाज युसुफ शेख (वय ३६ रा. मारुती आळी, गणपती चौक, शिवगंगा सोसायटी समोर, कोंढवा ) सुरज राजेद्र सरतापे (वय २८ रा. चिमटा वस्ती, सनपॅट्रीक चर्चच्या पाठीमागे, फातीमानगर, पुणे ) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे अधिकारी कर्मचारी ६ सप्टेंबरला हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी महंमदवाडीतील महाराष्ट्र वनविभागच्या आनंदवनमध्ये मोकळया जागेत पाचजण संशयितरित्या कोणाची तरी वाट पाहत बसले होते. पथकाने त्याठिकाणी धाव घेउन चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातुन ७ लाख ५२ हजारांचा मेफेड्रॉन जप्त केले. अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांच्याविरुध्द एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २९ अन्वये काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, नितिन जाधव, सुहास डोंगरे, संजय राजे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×