पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश
marathinews24.com
पुणे – पुण्यात १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या – शहर पोलीस दलातील १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील चार पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकपद सांभाळणाऱ्या चार अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची वाहतूक शाखेत बदली केली आहे.
कोंढव्यात टोळक्याकडून दुकानात तोडफोड – सविस्तर बातमी
गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांची विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक विठ्ठल पवार यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांची स्वारगेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियु्क्ती केली आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे यांची चतु:शृंगी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियु्क्ती करण्यात आली आहे. कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक विक्रमसिंह कदम यांची खडकी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, विजयमाला पवार, राहुल गौड, युवराज नांद्रे यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम यांची सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक जितेंद्र कदम यांची सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, खडकी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस दलातून पुणे शहर पोलीस दलात बदली झालेल्या पोलीस निरीक्षक अलकार सरग यांची बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
























