Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

राष्ट्रनिर्मितीमध्ये जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान – राज्यपाल आचार्य देवव्रत

६० देशांतर्गत व १७ परदेशी उद्योगांद्वारे हजारो युवकांना रोजगार

marathinews24.com

पुणे – जेबीएम समुहाने रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्वच्छ ऊर्जा, ऑटोमोबाईल उत्पादन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय काम केले आहे. उद्योग उभारणीसोबतच राष्ट्र-निर्मितीतही जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन – सविस्तर बातमी

जेबीएम समूहाच्या आयोजित ‘सर्वोत्कर्ष’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जेबीएम समूहाचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार आर्य, उपाध्यक्ष निशांत आर्य, आर्य समाजाचे प्रतिनिधी विनय आर्य, डॉ. संजय कुलकर्णी, कमलेश गुप्ता, सुशील बिंदल, जेबीएम समूहाचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपाल देवव्रत म्हणाले, भारताचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी ‘स्वदेशी’, ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच दिशेने वाटचाल करतांना जेबीएम समूहाने देशातील ६० आणि विदेशात १७ उद्योग संस्थांच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार दिला आहे. येथे तयार होणाऱ्या पर्यावरणपूर्वक बसेस विदेशातही निर्यात करुन देशाच्या जीडीपीमध्ये वाढ करण्याचे काम होत आहे.

जेबीएम समूहाच्यावतीने अध्यक्ष सुरेंद्रकुमार आर्य यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून ते पुढे म्हणाले, महर्षी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, मुल्य, नशा मुक्ती अभियान, महिलांना सन्मानाने वागणूक, शिक्षणाच्या अधिकाराला प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा, बालविवाह अशा कुप्रथेला आळा घालून समाजिक परिर्वतनाचे मोठे कार्य त्यांनी केले.

स्वातंत्र्याच्या लढ्यातही आर्य समाजाने सक्रीय सहभाग घेतला. महर्षी दयानंद सरस्वती आणि आर्य समाजाच्या कार्याची प्रेरणा घेवून संपूर्ण आर्य कुटुंबीय वाटचाल करीत आहेत. ‘सर्वाच्या कल्याणातून आपले कल्याण’ ही वृत्ती जोपासत जेबीएम समुहाने सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे समाजसेवा आणि वंचितांच्या कल्याणासाठी करीत असलेले कार्य प्रेरणादायी आहे, यापुढेही समुहाने देश व समाजाच्या कल्याणारिता कार्य करीत राहावे, असे आवाहनही देवव्रत यांनी केले.

कार्यकामापूर्वी राज्यपाल देवव्रत यांच्या हस्ते ‘हॉट स्टॅम्पिंग’ या प्रकल्पाची पायाभरणी करुन कोनाशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर)’ तपासणीकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले. या रुग्णवाहिकेद्वारे मुलीच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी जेबीएम उद्योग समूहातील उत्पादनाविषयी माहिती घेवून समाधान व्यक्त केले.

सुरेंद्रकुमार आर्य यांनी जेबीएम समूहाद्वारे राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. विनय आर्य यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×