दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ६ लाख २५ हजाराचा ऐवज लंपास
marathinews24.com
पुणे – दारूच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानाच्या ड्राव्हरमधील रोकड, मोबाईल असा २ लाख ७० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २० जुलैला वाघोलीतील केसनंद फाटा परिसरात घडली आहे. तसेच घराचा पत्रा उचकटून घरातील सोन्याचे व चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ३ लाख ५५ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना पिसोळीत घडली आहे. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ६ लाख २५ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
पुण्यात १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद फाटा परिसरात सागर वाईन्स असून, २० जुलैला दुकान कुलूप लावून बंद होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. काऊंटच्या ड्राव्हरमधील रोकड, मोबाईल असा २ लाख ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मालक सागर निरंजनकुमार बत्रा (वय ३३) यांनी वाघोली ठाण्यात फिर्याद दिली आहे. बत्रा हे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत.
घराचा पत्रा उचकटून चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा ३ लाख ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना २० जुलैला रात्री साडेनउच्या सुमारास पिसोळीतील दत्त मंदिराजवळ घडली. याप्रकरणी सचिन बाळासाहेब गोडावळे (वय ४५) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार गोडावळे यांचे घर कुलूप लावून बंद होते. रविवारी मध्यरात्री सुमारास चोरट्याने त्यांच्या घरात चोरी केली. गोडावळे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे करत आहेत.
कोयत्याच्या धाकाने मटण विक्रेत्याला लुटले; कोंढव्यातील घटना
मटण विक्रेत्याच्या दुकानातील कोयता ताब्यात घेउन हल्लेखोराने दुकानदाराला धमकावित त्याच्याकडील १ हजार २०० रूपयांची रोकड चोरून नेली. त्यानंतर कोयत्याच्या धाकाने नागरिकांना धमकाविल्याची घटना २० जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास कोंढव्यातील नवाजीश चौकात घडली आहे. याप्रकरणी पैâसल शेख उर्फ गोट्या (वय २५, रा.गुलटेकडी ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमेर समीर कुरेशी (वय १९ रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा चुलतभाउ मुन्वर कुरेशी हा २० जुलैला कोंढव्यातील नवाजीश चौकात मटण विक्रीच्या दुकानात एकटाच होता. त्यावेळी त्याच्या ओळखीतील पैâसल हा तिथे गेला. त्याने अचानकपणे दुकानातील मटण तोडण्याचा कोयता हातात घेउन मुन्वरला धमकाविले. दुकानातील गल्ल्यातील १ हजार २०० रूपयांची रोकड जबरदस्तीने ताब्यात घेतली. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये कोयत्याच्या धाकाने दहशत माजविली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद जाधव तपास करीत आहेत.























