केजमध्ये कोरडेवाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण : ५ बसेसवर दगडफेक

केजमध्ये कोरडेवाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण : ५ बसेसवर दगडफेक

बाळराजे आवारे यांचा अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – कोरडेवाडी साठवण तलाव आणि इतर विविध शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेली १२ दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सरकार दाखल घेत नसल्याने संतप्त आंदोलक कर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरले. केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाच तासांपासून रस्ता रोको आंदोलन सुरू ठेवले. दरम्यान पाच तास उलटून गेल्या नंतरही कुठलाही प्रशासनाकडून तोडगा निघत नसल्याने संतप्त होऊन अज्ञातांनी पाच बसेसवर दगडफेक करून नुकसान केले आहे. त्यामुळे दोन्ही महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून महामार्गावर सुमारे तीन ते चार किमीच्या रांगा लागल्या होत्या .

एकजुटीने सामूहिक अर्थनिर्मिती केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकारेल – सविस्तर बातमी

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने कोरडेवाडी येथे राजश्रीताई उमरे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी ता. केज येथे साठवण तलावाच्या पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांना प्रति हेक्टर ५० हजार नुकसान भरपाई देण्यात यावी,ज्ञानराधा बँकेची स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्यात यावा,त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून ठेवीदारांचे पैसे तातडीने परत करण्यात यावेत,शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. शैक्षिणिक फीस माफ करण्यात यावी,या पाच प्रमुख मागण्या साठी दि. ३ ऑक्टोबर पासून कोरडेवाडी येथे आमरण उपोषणाला बसल्या आहेत.

आज त्यांच्या उपोषणाचा बारावा दिवस आहे. मात्र त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने दि. ८ ऑक्टोबर रोजी संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालया समोर पेट्रोल टाकून बैलगाडी पेटविली. तसेच दि. ११ ऑक्टोबर रोजी सुमारे शंभर आंदोलकांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले. मात्र, त्या नंतरही सरकार आणि प्रशासनाचे लक्ष न दिल्यामुळ दि. १४ ॲाक्टोबर मंगळवार रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि गांवकरी यांनी केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी ४:३० वाजून गेले तरी रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने बीड -अंबाजोगाई, केज- माजलगाव आणि केज- कळंब या महामार्गावरील वाहतूक खोळंबली असल्याने शहराच्या वाहनांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. या रांगेत उभ्या असलेल्या पाच एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक करून आंदोलनाला हिंसक या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी पाच बसेसवर दगडफेक केली आहे. यामध्ये विविध आगाराच्या बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.

अज्ञातांकडून दगडफेक झालेल्या बसेसची नावे-

१) उदगीर – गंगापूर
२) अहमदपूर – चाळीसगाव
३) गंगाखेड – आळंदी
४) लातूर – पाटोदा

आंदोलनातील प्रमुख मागण्या-

१)शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. २) मराठवाड्यात ‘ओला दुष्काळ’ जाहिर केला असून त्यामध्ये तातडीनेवाढ करून प्रति हेक्तर, 50 हजार रु. इतकी सरसकट अर्थिक मदत करण्यात यावी.३) कोरडेवाडी येथील साठवण तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे. ४) ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांचे संरक्षण व थकीत रक्कम परत देण्याबाबत. ज्ञानराधा बँकेची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता शासनाच्या ताब्यात घेऊन लिलाव प्रक्रिया राबवून त्यातून मिळालेल्या ठेवीदारांचे पैसे तातडीने परत करण्यात यावेत. ५) मराठवाडा व सोलापूर जिल्हातील विद्यार्थ्यांचे शेक्षणिक फीस माफ करण्यात यावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×