Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) आयकर कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) आयकर कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुण्यातील साधू वासवानी चौक येथील आयकर विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

marathinews24.com

पुणे – लोकजनशक्ती पार्टी रामविलासतर्फे पुण्यातील साधू वासवानी चौक येथील आयकर विभागाच्या कार्यालयासमोर बुधवारी (दि.९) सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात टाळ्या, थाळ्या तसेच देशी वाद्यांच्या आवाजात प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन इन्कम टॅक्स इनफॉर्मेंट्स रिवॉर्ड स्कीम २०१८ अंतर्गत इन्फॉर्मंट कोड मिळविण्यासाठी दाखल केलेल्या मागणीकडे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात करण्यात आले.

पुणे मार्केटयार्डमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लुटमार – सविस्तर बातमी 

जिल्हाध्यक्ष संजय अल्हाट म्हणाले, “आम्ही आयकर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांविषयी विश्वसनीय माहिती प्रशासनाला वेळोवेळी दिली. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यावेळी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, के. सी. पवार, अमर पुणेकर, कल्पना जावळे, नारायण भिसे, रणजित सोनावळे, राहुल उभे उपस्थित होते. त्यांनी स्पष्ट केले की हे आंदोलन सरकारविरोधी नसून कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आहे. ही लढाई देशाच्या हितासाठी आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालयातील अधिकारी मोहित जैन, पीयूषकुमार सिंह यादव, संदीप प्रधान आणि आनंद उपाध्याय यांच्याकडे तक्रारी असूनही त्यांनी कोणतीही कृती केली नाही. त्यामुळे त्यांच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट वर्तनाविरोधात केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

२०१८ पासून आजतागायत किती इन्फॉरमेन्ट कोड निर्गमित केले. आता कार्यरत अधिकाऱ्यांनी किती कोड निर्गमित केले, या कोडद्वारे किती आयकर जमा केला. या मुद्द्यांवर पक्षाने लेखी माहिती विचारली असता ती देण्यात आली नाही. यात भ्रष्टाचार असल्याने ही माहिती टाळण्यात आली. इन्कम टॅक्स इन्फॉरमेन्टस रिवॉर्ड स्कीम २०१८ ची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे आयकर विभागाच्या प्रशासनातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×