Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

वाहन चालकाला लुटणारा गजाआड, २ मोबाईल जप्त

सहकारनगर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मोटार चालकाला दुचाकी आडवी मारून अपघाताचा बनाव करीत लुटमार करणार्‍या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मोटार चालकाचे चोरलेले दोन्ही मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. ही घटना ६ सप्टेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास चव्हाणनगर कमान चौकात घडली होती. अनिकेत गणेश शिंदे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून अंगठी चोरी – महिलेविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

तक्रारदार तरूण हे ६ सप्टेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास चव्हाणनगर कमान चौकातून मोटारीतून प्रवास करीत होते. त्यावेळी दुचाकीस्वार तिघाजणांनी त्यांच्या मोटारीला गाडी आडवी उभी करून अपघाताचा बनाव केला. त्यामुळे तक्रारदाराने गाडीतून खाली उतरून कोणी जखमी झाले आहे का, याची विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने त्यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील दोन मोबाइल हिसकावून टोळके पसार झाले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली.

तपास पथकातील पोलीस अमलदार अमोल पवार आणि अमित पदमाळे यांना आरोपा आरो आरोपींची माहिती मिळाली. गुन्हा करणारे तिन्हीही आरोपी सहकारनगरमधील ट्रेझर पार्क परिसरात दुचाकीवर बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने धाव घेत अनिकेत शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २५ हजारांचे दोन मोबाइल जप्त केले आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर, बापु खुटवड, बजरंग पवार, नीलेश शिवतरे, संदीप कोळगे, रफिक तडवी, किरण कांबळे, अभिमान बागलाने, महेश भगत, सागर सुतकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×