चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती तुळशीबागेत खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील दागिने, रोकड चोरीला घटना वाढल्या आहेत. तुळशीबागेत खरेदीसाठी गेलेल्या ठाण्यातील महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना नुकतीच घडली. महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात मॉर्निंग वॉक करणार्या जेष्ठाची चैन हिसकावली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची ठाणे शहरातील आहेत. त्या ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नातेवाईकांसोबत तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. चोरट्यांनी गर्दीत महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र लांबविले. मंगळसूत्र चोरीला गेल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार नाकाडे तपास करत आहेत.
खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटना तुळशीबाग परिसरात घडल्या आहेत. मध्यभागताील तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आळी, कापडगंज परिसरात महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत.




















