चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – गोदामाच्या खिडकीवाटे आतमध्ये शिरून चोरट्यांनी १ लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२५ कालावधीत येवलेवाडीतील आंतुलेनगर रोडवर घडली आहे. याप्रकरणी मार्कटयार्ड परिसरात राहणार्या तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निवृत्त लष्करी जवानाकडून नातेवाईकाच्या घरात चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मार्केटयार्ड परिसरात राहायला असून, येवलेवाडी परिसरात त्यांचे गोदाम आहे. त्याठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या जातात. नोव्हेंबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२५ कालावधीत चोरट्यांनी उघड्या खिडकीवाटे आतप्रवेश करीत तांब्याच्या तारा, पॅनेल केबल, पेपर प्लेट कटर, ऑईल असा १ लाखांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमित कुंभार तपास करीत आहेत.
आंबेगाव बुद्रूकमध्ये टॉवरमध्ये चोरी
जीवो टॉवरमधील बेस बॅन्ड युनीटसह ८५ हजारांच्या ऐवजाची चोरीची घटना १ ऑक्टोबरला आंबेगाव बुद्रूकमधील गणेश टेम्पल अमित ब्युल्म फिल्ड सोसायटीमागे असलेल्या टॉवरमध्ये घडली आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणार्या २५ वर्षीय तरूणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जीवो टॉवरमध्ये कामाला असून, चोरट्यांनी १ ऑक्टोबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास प्रवेश केला. टॉवरमधील ५ जी बेसबॅन्ड आणि ७ एसएफपी युनीट असा मिळून ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर संबंधिताने आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार मासाळ तपास करीत आहेत.



















