Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

निवृत्त लष्करी जवानाकडून नातेवाईकाच्या घरात चोरी

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

पोलिसांनी याप्रकरणी निवृत्त जवानाला केली अटक

marathinews24.com

पुणे – निवृत्त लष्करी जवानाने नात्यातील एकाच्या घरातून ४ लाख २६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी निवृत्त जवानाला अटक केली आहे. संदीप सुरेश चव्हाण (वय ४३, रा. साईसिद्धी काॅलनी, आदर्शनगर, दिघी) असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातून सराईतांना दणका; एकाचवेळी १८ सराईत तडीपार – सविस्तर बातमी

तक्रारदार महिलेचे पती लष्करात जवान असून, ते चेन्नईत नियुक्तीस आहेत. आरोपी संदीप चव्हाण हा लष्करातून निवृत्त झाला असून, तो तक्रारदार महिलेच्या नात्यातील आहे. महिला आणि तिचा मुलगा २६ सप्टेंबर रोजी नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेली होती. चार दिवसानंतर महिला घरी परतली. तेव्हा सदनिकेतील बॅगेत ठेवलेले चार लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. महिलेने याबाबत मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तांत्रिक तपासात सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून दागिने चोरल्याची माहिती मिळाली. चौकशीत निवृत्त जवान चव्हाण याने दागिने लांबविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चैाकशीत त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, सहायक निरीक्षक राजू महानोर, पोलीस कर्मचारी राजू कदम, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, राहुल मोरे, शिवाजी धांडे, रुपेश तोडेकर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×