दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचच्या हद्दीतील १८ सराईतांना दोन वर्षांसाठी तडीपार
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात दहशतीसह दादागिरी करणार्या गुंडांविरूद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचच्या हद्दीतील १८ सराईतांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सराईतांना तडीपार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, संबंधित गुन्हेगारांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नसल्याचा इशारा पोलिसांनी कारवाईतून दिला आहे.
पोलिस शिपायासह निवृत्त उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात – सविस्तर बातमी
परिमंडळ पाचच्या हद्दीतील काळेपडळ, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, लोणी-काळभोर, हडपसर, फुरसुंगी, मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संबंधित सराईतांविरूद्ध कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध प्रस्ताव तयार करून परिमंडळ कार्यालयास पाठविण्यात आला. गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी तसेच आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने गुन्हेगारांविरूद्ध ठोस कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, एकाचवेळी शहरातून १८ सराईतांना तडीपार केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, कारवाईचे कौतुक केले आहे.
तडीपार केलेल्या सराईतांची नावे
कानिफनाथ शंकर घुले (वय ४९ रा. महमंदवाडी) प्रमिला सचिन काळकर (वय ४१ रा. महमंदवाडी) रफिक उर्फ टोपी मेहमूद शेख (वय ५५ रा. कोणार्क सोसायटी, कोंढवा) गब्बू सनी प्रकाश परदेशी (वय ३३, रा. वानवडी) मौला उर्फ मौलाना रसूल शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) गणेश तुकाराम घावरे (वय २८, रा. काकडेवस्ती कोंढवा बुद्रूक) नंदा प्रभू बिनावत (वय ५०, रा. बिबवेवाडी) अविनाश उर्फ तावू अर्जुन जोगन (वय २७, रा. अप्पर बिबवेवाडी) सारंग बबन गायकवाड (वय ३०, रा. अप्पर बिबवेवाडी) उमेश उर्फ टकाभाउ निवृत्ती राखपसरे (वय ५०, रा. थेउर फाटा, हवेली) विनायक आदिकराव लावंड (वय ३१, रा. लोणी काळभोर) शुभम सुदाम विरकर (वय २५, रा. विरकरवस्ती, लोणी काळभोर) रोहन सोमनाथ चिंचकर (वय २७, रा. गाडीतळ, हडपसर) बापू सुरेश मकवाना (वय २१, रा. हडपसर) अनिकेत राजेश शेलार (वय २२, रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा) दत्ता गणेश गायकवाड (वय ३६, रा. मुंढवा) दीपक उर्फ कव्वा गणेश गायकवाड (वय ३८, रा. मुंढवा) अमोल राजेंद्र तट (वय ४५, रा. पापडेवस्ती, भेकराईनगर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हेगारांविरुद्ध कारवाईमध्ये परिमंडळ पाच अव्वल
जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ कालावधीत परिमंडळ पाचमध्ये सर्वाधिक गुन्हेगारांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २२ सराईत गुन्हेगारांविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाई केली आहे. तसेच १२ मोक्कामधील ७८ गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. आजपर्यंत ५० सराईतांना तडीपार केले असून, १५० सराईतांविरूद्ध ठोस कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली आहे.





















