Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

ऊस वाहतूक करतांना अपघात रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात-

ऊस वाहतूक करतांना अपघात रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात-

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

marathinews24.com

बारामती – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी साखर कारखान्यांच्या गाळप हंगामादरम्यान उस वाहतूक करतांना होणारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक करावयाच्या उपायोजनांबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे बुधवारी (दि. 12 नोव्हेंबर) बैठक घेवून सूचना केल्या.

पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश – सविस्तर बातमी 

या बैठकीस सहायक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील, तसेच कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व साखर कारखान्यांचे शेतकी अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

निकम यांनी ट्रॅक्टरव्दारे व इतर वाहनातून ऊसाची वाहतूक करतांना अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उसाची वाहतूक करतांना वाहनांची सर्व वैध कागदपत्रे संबंधित वाहनचालकाने सोबत ठेवावीत. वाहनाच्या पाठीमागच्या भागास रिफ्लेक्टिव्ह टेप व पट्टी असणारे लाल रंगाचे कापड लावावेत. वाहनचालकांनी वेगमर्यादांचे पालन करण्यासह वाहतुक सुरक्षितेच्या सर्व नियमांचेही पालन करावे. वाहतूक करतांना वाहनचालकांने मद्यप्रशासन करु नये. वाहनामध्ये मोठ्या आवाजाने ध्वनिक्षेपक (स्पीकर) लावू नये, अशा सूचना निकम यांनी दिल्या.

संबंधित साखर कारखान्यानी वाहतूक व रस्ते सुरक्षाविषयक नियमांच्या सर्व बाबींची प्रवेशद्वारावरच तपासणी करावी. संचालक मंडळांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे रस्ता सुरक्षिततेच्या व वाहतुकीदरम्यान घ्यावयाची काळजी, उपाययोजनांबाबत प्रबोधनात्मक शिबीराचे आयोजन करुन वाहनचालकाना मार्गदर्शन करावे,असेही निकम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×