उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती येथे ‘वैद्यकीय मदत कक्ष’ सुरु

रायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपल आयटी’ मंजूर

तालुक्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष

marathinews24.com

बारामती – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बारामती तालुक्यातील नागरिकांना तातडीने आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याच्याकरिता वैद्यकीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.

छत्रपती शाहू महाराज संवाद आणि संघर्षाचे प्रतिक : डॉ. श्रीपाल सबनीस – सविस्तर बातमी

उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, मेडद, १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) यांची स्थापना अशा विविध माध्यमातून बारामती तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे.

वैद्यकीय मदत कक्ष, पहिला मजला, कृषी भवन, नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथे स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामुळे नागरिकांना त्यांच्या भागातच आरोग्य विषयक अडचणीबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. परिणामी आरोग्यविषयक मदत किंवा मार्गदर्शनाकरिता
मुंबई येथे जाण्या-येण्याचा वेळ वाचण्यासोबतच त्यांची आर्थिक बचतही होणार आहे.

नागरिकांनी आरोग्याबाबत कोणतीही वैद्यकीय अडचण, मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक नितीन हाटे यांच्या ९८१९६३८९०८, ७९७७४७७३८२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top