Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्‍हा दाखल

हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

खडक पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल

marathinews24.com

पुणे – दहा वर्षाची मुलगी तिच्‍या मैत्रीणीसोबत खेळत असताना तिचा पाठलाग करून हाताने इशारे करून डोळा मारत तिचा विनयभंग केल्‍याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एस. के. जावीर (43, रा. मोमीनपुरा, घोरपडी पेठ) याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पुतणीचा विनयभंग केल्‍याने चुलत्‍याने आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार; गुन्‍हा दाखल

पुणे- अल्पवयीन मुलीची मावशी आणि आजी भाजी आणण्यासाठी बाहेर गेल्‍यानंतर मुलीच्‍या घरात शिरून तिच्‍यावर जबरदस्‍तीने लैंगिक अत्‍याचार केल्‍याचा धक्‍कादाय प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पियुष हादवे (24, रा. पुणे) याच्‍यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तिला तिच्‍या सोबत केलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्‍यास बदनामी होईल असेही सांगितले. हा प्रकार 24 ऑगस्‍टला दुपारी बारा वाजण्याच्‍या सुमारास घडला.

नराधम पित्‍याकडून मुलीवर लैंगिक अत्‍याचार

नराधम पित्‍याकडून आपल्‍या मुलीवरच लैगिंक अत्‍याचार केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्‍यान मुलीने गोळ्या घेऊन गर्भपात केल्‍याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरूणीने दिलेल्‍या तक्रारीवरून पित्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुन 2024 ते 27 ऑक्‍टोबर दरम्‍यान घडला. तर मुलीने जानेवारी 2025 मध्ये गर्भपात करून घेतला. याप्रकरणी मुलीने दिलेल्‍या तक्रारीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×