अॅक्शनवर रिअॅक्शन होणारच; अमित ठाकरे यांचा इशारा
marathinews24.com
पुणे – शहरातील सदाशिव पेठेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभविप) कार्यालयाची तोडफोड करुन कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्यांसह २० ते ३० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मनसेचे युवक सेना प्रमुख अमित ठाकरे यांनी अॅक्शनवर रिअॅक्शन होणारच असा इशारा दिला आहे. त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली.
केजमध्ये कोरडेवाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण : ५ बसेसवर दगडफेक – सविस्तर बातमी
अभाविपच्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे यांच्या फिर्यादीनुसार मनविसेचे पदाधिकारी धनंजय दळवी, केतन डोंगरे, आशितोष माने, महेश भोईबार, हेमंत बोळगे यांच्यासह २० ते ३० जणांविरुद्ध गुन्हा केला आहे. मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोमवारी (दि.१३) दुपारी कार्यालयात शिरले होते. तेथील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, तोडफोड करुन कार्यालयाला कुलूप निघून गेले. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, विश्रामबागच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली होती. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहे.
मंगळवारी (दि. १४) सकाळी मनसेचे युवक सेना प्रमुख अमित ठाकरे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे उपस्थित होते. त्यांनी अभाविपला इशारा दिला आहे.
तुम्ही बोट घातलंत, तर आम्ही हात घालणार
अमित ठाकरे यांनी संबंधितांना इशारा दिला असून, अॅक्शनवर रिक्शन होणारच. हा प्रकार दुसर्यांदा झाला आहे. सत्तेत असल्याने कितीही प्रेशर टाकले तरी फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत उभा आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवायची माझी इच्छा नाही, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. आमच्या विरोधात लावलेल्या पोस्टरबाबत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी बोललो आहे. सीसीटीव्ही तपासला जाईल. जर त्यात त्यांची मुले आढळली, तर त्यांची सर्व कार्यालये बंद करावी लागतील असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
पुण्यातील परिस्थितीबाबत ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्याची परिस्थिती गंभीर असून, ड्रग्स, महिलांवर अत्याचार, लहान मुलांना दारू हे प्रकार वाढत आहेत. पोर्शे अपघातानंतरही काही झाले नाही. १८ वर्षाखालील मुलांना दारू देणं ही भयंकर गोष्ट आहे, आणि याची आम्ही लिस्ट तयार करतोय.




















