Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

बालसाहित्यात वैज्ञानिक मांडणीला अधिक महत्त्व- डॉ. सदानंद मोरे

इंदिरा अत्रे बालसाहित्य’ पुरस्कारांचे वितरण

marathinews24.com

पुणे – बाल साहित्याच्या माध्यमातून मुलांची फक्त करमणूकच नव्हे तर त्यांना सिद्धांत सांगणे, त्यांच्यावर संस्कार करणे, संदेश देणे आणि त्यांच्यातील जिज्ञासा जागृत करण्याचे कार्य केले जाते. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार व्हावा, लहान मुलांपर्यंत हा दृष्टीकोन गोष्टीरूपात पोहोचावा यासाठी वैज्ञानिक मांडणी असलेल्या पुस्तकांचे महत्त्व मोठे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक, समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. बालसाहित्य पुरस्कारांची निवड चोखंदळपणे करण्यात आली आहे, या विषयीही त्यांनी कौतुक केले.

मराठा समाजाचा लढा संविधानिक मार्गाने – सविस्तर बातमी

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (दि. २९ ) डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात कार्यक्रम पार पडला. डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी., दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे मानद सभासद अभिजित जोग मंचावर उपस्थित होते. डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या ‌‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’ या किशोर-कुमारवयीन गटासाठी लिहिलेल्या कादंबरीला, राजीव तांबे यांच्या ‌‘डेंजरस झिरो ग्राउंड प्लेट’ या बाल साहित्यास, मिलिंद सबनीस लिखित ‌‘कहानी वंदे मातरम्’ची पुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच पुस्तकातील चित्रांसाठी चंद्रशेखर जोशी यांना तसेच विशेष उल्लेखनीय पुस्तक म्हणून वर्षा चौगुले यांच्या ‘गंमत शब्दांची’ तर संजीवनी बोकील यांच्या ‘गोष्टींतून कबीर’ या पुस्तकास पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’ या पुस्तकासाठीचा पुरस्कार डॉ. रूपाली अभ्यंकर तर ‘गोष्टींतून कबीर’ या पुस्तकासाठीचा पुरस्कार प्रकाशक मधुर बर्वे यांनी स्वीकारला. रोख रक्कम व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या ९९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रास्ताविकात पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे म्हणाले, अधिकाधिक दर्जेदार बालसाहित्य वाचकांपर्यंत जावे या करिता डॉ. प्रभा अत्रे याच्या संकल्पनेतून संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते. ही पुस्तके संस्थेतर्फे खरेदी करून त्यांचे सुयोग्य परिक्षण केले जाते. मगच पुरस्कारांसाठी निवड करण्यात येते. पुस्तकाची सजावट व मांडणी करणाऱ्या चित्रकारांना देखील डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतून पुरस्कार दिला जातो, हे वैशिष्ट्य आहे.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, लहान मुले ही समाजघटकच असतात कारण ते उद्याचे सुजाण नागरिक असतात. इंदिरा अत्रे या बाल साहित्यकार म्हणून प्रसिद्ध असल्या तरी त्यांची लेखनकक्षा रूंद होती. अवघड विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हतोटी होती. डॉ. प्रभा अत्रे यांनी इंदिरा अत्रे यांच्या नावे बालसाहित्यकार पुरस्कार सुरू करून त्यांचे कायमस्वरूपी स्मारक उभारले आहे. पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या माध्यमातून विज्ञान आणि संस्कृती मुलांपर्यंत सहजतेने पोहोचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
बालसाहित्य संमेलने, साहित्य संमेलनात बाल साहित्याचा विचार तसेच बाल साहित्याला पुरस्कार यातून बालसाहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास डॉ. मोरे यांनी व्यक्त केला. तसेच राजीव तांबे म्हणाले, इंदिरा अत्रे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने मला बाल ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झाल्याचे समाधान लाभले आहे. डॉ. रूपाली अभ्यंकर म्हणाल्या, मुलांना लहानपणापासूनच वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. चंद्रशेखर जोशी, वर्षा चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×