मतदान जनजागृती अभियानात साडेचार लाखाहून अधिक मतदारांचा सहभाग

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत आयोजित १४ हजार २१६ उपक्रमाच्या माध्यमातून एकूण ४ लाख ७८ हजार २८८ इतक्या मतदारांनी सहभाग घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावाख् असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

न्यायव्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद – ॲड. असीम सरोदे – सविस्तर बातमी

बारामती तालुक्यात ४० हजार, मावळ ६९ हजार ७९०, मुळशी ४३ हजार ८३५, शिरुर ७० हजार ३५६, हवेली ३३ हजार ५६८, दौंड ३४ हजार ४१९, इंदापूर २ हजार ९९८, पुरंदर १ हजार ६२७, भोर ६ हजार ८५६, वेल्हे २५ हजार २९६, आंबेगाव ६० हजार २२३, जुन्नर ८१ हजार ५०० आणि खेड तालुक्यात ७ हजार ८२० असे एकूण ४ लाख ७८ हजार २८८ मतदारांनी सहभाग घेतला आहे

मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदार यादीत नाव शोधणे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट १ हजार ७७५, पदयात्रा- ६६ हजार ६३१, कलापथक, पथनाट्य ८ हजार ९५७, सायकल यात्रा१५ हजार ४३१, मानवी साखळी १४ हजार ९०३, मतदारांना शपथ १ लाख २६ हजार ७७०, गृहभेटी ४१ हजार ३१५, महिलांकरिता मतदान जागृती विशेष कार्यक्रम ३२ हजार ३६८, स्टेटस दिवस, सेल्फी दिवस, समाज माध्यमांचा वापर ७ हजार १६८, प्रभातफेरी, मतदार जागृती फेरी ८० हजार ८३९, चित्रकला स्पर्धा २३ हजार ६८०, रांगोळी २० हजार २३९, इतर (संकल्पपत्र) ३८ हजार २१२ असे एकूण १४ हजार २१६ उपक्रमाच्या माध्यमातून मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×