पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्याकडून तक्रार
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
नागरिकांनो दिवाळीला गावी चाललाय…घरांची सुरक्षितता वाढवा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा ऐतिहासिक स्मारकात असून, मनाई असताना तीन अनोळखी महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) दुपारी पावणेदोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान घटना घडली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी रविवारी (दि.१९ ) उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांकडून प्राचीन स्मारके, पुरातत्वशास्त्रीय स्मारके आणि अवशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
भाजप खासदाराकडून आंदोलन
शनिवारवाड्याच्या आवारात ऐन दिवाळीत महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना पतित पावन संघटनाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात रविवारी (दि.१९ ) आंदोलन केले होते. त्यानंतर परिसरात कार्यकर्त्यांनी शिववंदना केली.
खासदाराविरूद्ध गुन्हा दाखल करावा-रूपाली पाटील ठोंबरे
पुण्यात सर्व जातीधर्माचे बांधव गुण्यागोविंद्याने राहतात. ’शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य तसेच पेशव्यांनी दाखविलेल्या शौर्याचे प्रतीक आहे. मेधा कुलकर्णी खासदार असून, त्यांना विसर त्यांना पडला आहे. कोथरूडनंतर त्या कसब्यात येऊन हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. याप्रकरणी कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवत्तäया रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.



















