गुंतवणुकीच्या आमिषाने परिचारिकेची ५३ लाखांची फसवणूक

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका परिचारिकेची ५३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परिचारिकेने सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून ६ लाखांची रोकड लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५१ वर्षीय परिचारिका घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर राहायला आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. शेअर बाजारातील गुंतवणूक योजनेची माहिती त्यांना देण्यात आली. सायबर चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ५३ लाख ४८ हजार रुपये जमा केले. महिलेने पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. महिलेने परताव्याबाबत विचारणा केली. तेव्हा चोरट्यांनी टाळाटाळ केली.
त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या खात्यात ३९ हजार ६९९ रुपये जमा केले. उर्वरित रक्कम दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक

ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाची दोन लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारमळ तपास करत आहेत.

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी तरुणाची ३ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. बँकेकडून बँक खाते अद्ययावत (अपडेट) करण्यात येत आहे. बँक खाते अद्ययावत न केल्यास व्यवहार करता येणार नाही, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. माहितीचा गैरवापर करुन ३ लाख ३० हजार ७७२ रुपये लांबविण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×