Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

तरच ‘फुलेंच्या शैक्षणिक क्रांतीच्या ऋणातून’ महाराष्ट्र उतराई होईल

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचे विधान

marathinews24.com

पुणे – मानव जातीच्या ऊत्थानाचे मुळ हे केवळ शिक्षण असल्याचे ज्यांना माहीत होते, त्या महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले ऊभयतांनी, शिक्षणाची कवाडे’ राज्यातील सर्व जाती जमातीच्या स्त्री- पुरषांना सरसकट उपलब्ध करून देण्यासाठी संघर्ष केला, हाल अपेष्टा सोसल्या त्याचे ऋण महाराष्ट्रावर सदैव असल्याचे विधान महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. महात्मा फुलेच्या पुण्यतिथी चे औचित्याने, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय चे वतीने शेतकी कॅालेज’च्या महात्मा फुलें च्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर – सविस्तर बातमी

कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांभुळकर, कृष्णा साठे, रविराज कांबळे, विकास अवचार, संदीप गायकवाड, अविनाश राठोड, ओम भवर हे उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्य संस्थापक शिव छत्रपतींच्या, संतांच्या, समाज सुधारक शाहू महाराज, महात्मा फुले, नामदार गोखले, डॉ आंबेडकर व आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शैक्षणिक दर व साक्षरता वाढून देखील ‘संविधानीक लोकशाही मुल्यां’ बाबतची अनास्था महाराष्ट्रास गर्तेच्या खाईत लोटणारी असल्याचे सद्य स्थितीचे वास्तव आहे.

‘ब्रिटिश कालीन स्वातंत्र्य पुर्व काळात, जातीय भेदा – भेद असतांना, समाजात शैक्षणिक क्रांतीची मशाल ज्यांनी पेटवली अशा महात्मा फुलें द्वयतांचे ऋण महाराष्ट्र विसरु शकणार नाही. शैक्षणीक शहाणपणाचे मोल स्वातंत्र्योत्तर भारताच्या निर्मितीस दिशा देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेत निश्चितच असले पाहिजे. त्यासाठी ‘संविधानीक जागरूकता व सुशिक्षितता’ सिद्ध करुनच ‘फुलेंच्या शैक्षणिक क्रांतीच्या ऋणातून’ महाराष्ट्र उतराई होईल असे म्हणणे सार्थक ठरेल असे वक्तव्य ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी केले.

महाराष्ट्र एनएसयुआय चे उपाध्यक्ष अक्षय कांबळे म्हणाले कि “महात्मा फुले म्हणायचे – ‘विद्या विना मती गेली. शिक्षणाशिवाय माणूस प्रगत होऊ शकत नाही, आणि जातभेद, लिंगभेद यांना हरवता येत नाही.

अभिजीत गोरे म्हणाले, महात्मा फुले यांचे विचार आजही आपल्यासाठी जीवनात दीपस्तंभ आहेत. ‘चला, फुलेंच्या शिकवणींचा मार्ग अनुसरून ज्ञान मिळवूया, भेदभाव मिटवूया आणि समाज बदलण्यासाठी पाऊल टाकूया.'”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×