Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन

तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली माहिती

marathinews24.com

बारामती – पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता कवीवर्य मोरोपंत सभागृह, इंदापूर रोड, बारामती येथे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.

बँकर्सची जिल्हा सल्लागार समिती बैठक संपन्न – सविस्तर बातमी

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत, याकरिता सोडतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाकरिता उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची निरीक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तरी पंचायत समिती क्षेत्रातील इच्छुक रहिवाशांनी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×