Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

२२ जुलै रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयात ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व टिकाराम जगन्नाथ कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स, खडकी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयात ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन – सविस्तर बातमी 

या मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील अनेक उद्योजक त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसह या रोजगार सहभागी होणार असून पदभरती करणार आहेत. याद्वारे जिल्ह्यातील १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, पदविकाधारक आदी विविध पात्रताधारक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

इच्छुकांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. खाजगी क्षेत्रातील रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहेत. मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.

प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, शिरुर, आळेफाटा, ता. जुन्नर व अमेझ इंजिनिअर्स सोल्युशन, नाणेकरवाडी ता. खेड येथेही २२ जुलै २०२५ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नामांकित उद्योजक सहभागी होणार असल्याने, स्थानिक उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

तसेच नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पॉलीटेक्निक, नायगाव (नसरापूर), ता. भोर, व शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, शारदानगर, ता. बारामती येथे करिअर समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांच्या करिअरची दिशा निश्चित करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन याद्वारे मिळू शकणार आहे.

वरील सर्व उपक्रम उमेदवारांकरिता निःशुल्क असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपल्या करिअरचा पाया मजबूत करावा. रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही आवाहन मोहिते यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×