पुण्यात लुटमारीचा दे धक्का पॅटर्न पादचार्यांना धक्का मारून पाया पडण्याचे नाटक पैसे चोरणार्या दोघा सराइतांना अटक
Marathinews24.com
पुणे – रस्त्याने पायी जाणार्या नागरिकांना मुद्दामहून धक्का मारून त्यांच्या पाया पडण्याचे नाटक करीत खिशातील पैसे चोरणार्या दोघा सराईतांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून दुचाकी जप्त करण्यात आली असून, त्यांनी अशाप्रकारे कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत का, याबाबतची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. आस्लम इस्माइल शेख (वय २१ रा. बिल्डींग नं. १, फ्लॅट नं. २०६, नवीन म्हाडा, सातवाडी, हडपसर) आणि साद अकबर पठान (वय २३ रा. गल्ली क्रमांक ७ ए वेस्टर्न बेकरी गल्ली, सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
खुल्या रस्त्यावर टाकलेले १३ अर्भक; पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ९ एप्रिलला धनकवडीतील शाहू बँक चौकातून पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना विनाकारण धक्का मारला. त्यानंतर गाडी थांबवून दोघांनी तक्रारदाराला आमची चुक झाली, माफ करा असे म्हणत पाया पडण्याचा बहाणा केला. त्यानंतर दोघापैकी एका चोरट्याने तक्रारदाराच्या खिशातून ३० हजारांची रोकड चोरून नेली. रक्कम खिशात नसल्याचे लक्षात येताच, तक्रारदाराने सहकारनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी १३६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला.
दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी वापरलेल्या दुचाकी क्रमांकावरून वाहन मालकाची माहिती मिळविली. त्यानुसार ही चोरी सराईत आस्लम शेख आण् िसाद पठाण यांनी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेउन चौकशी केली. त्यावेळी दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.