Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी पत्रकार संघाद्वारे ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्कार

marathinews24.com

मुंबई – मराठी पत्रकार संघाद्वारे ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्कार मला प्रदान केला आहे. फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्यासह जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बुक ‘फिनिक्स’चे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या ‌‘अतुलनीय आशा‌’ कार्यक्रम उत्साहात – सविस्तर बातमी 

मराठी पत्रकार संघाने दिलेला आणि पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेल्या या फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि पदाची जबाबदारी सांभाळण्याचे बळ द्विगुणित झाले आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या सन्मानासाठी पत्रकार संघाचे आणि संपादक मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीच्या गाड्याची दोन चाके आहेत. ही दोन चाके एकमेकांसोबत चालली तरच लोकशाही योग्य रुळावर राहते. टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी आमची बाजूही ऐकून घ्यावी. लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात पत्रकारिता अधिक कठीण झाली आहे. कोविडनंतर तर आव्हान अधिक वाढले. पत्रकार दिवस-रात्र रस्त्यावर असतात. हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ मजबूत राहावा म्हणून सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.

सकारात्मक विचारसरणीने अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारी कामे करता आली. राज्यशासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग, शेतकऱ्यांची निराशा दूर करणारे उपक्रम हे पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून शक्य झाले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून जल संधारणाच्या कामांत योगदान दिले. भारतीय योग, आयुर्वेद, चिकित्सा व परंपरांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यात पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे मोठे योगदान आहे. भारतीय विचार जगभर पोहचवण्याचे आणि मानवतेचा धर्म शिकवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष अभिमानाची बाब असल्याचे, फडणवीस म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक व इतर मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×