Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या ‌‘अतुलनीय आशा‌’ कार्यक्रम उत्साहात

लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या ‌‘अतुलनीय आशा‌’ कार्यक्रम उत्साहात

वाढदिवसानिमित्ताने ‌आशा भोसले यांना कलाकारांची स्वर-शिल्प भेट

marathinews24.com

पुणे – सुप्रसिद्ध सदाबहार गायिका आशा भोसले यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कलाकारांनी सोमवारी ( दि.८) त्यांना अनोखी स्वर-शिल्प भेट दिली. आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे त्यांच्या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या ‌‘अतुलनीय आशा‌’ सांगितीक कार्यक्रमाचे पूना गेस्ट हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वर्षा जांभेकर यांची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेली गीते डॉ. जांभेकर यांच्यासह डॉ. माया माईणकर, हेमा कुलकर्णी, अनघा एकबोटे, मेधा सेनगावकर, शुभांगी पांचाळ, धनंजय इंगळे, योगेश वाघेला, उदय गाडगीळ, अतुल महाजन यांनी सादर केली.

कोणार्क सूर्य मंदिराचा वैभवशाली इतिहास जाणून धन्य झाले– डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

‌‘वक्रतुंड महाकाय‌’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‌‘रुपेरी वाळूत‌’, ‌‘रेशमाच्या रेघांनी‌’, ‌‘जीवन के हर मोड‌’, ‌‘आओ ना गले लगाओ ना‌’, ‌‘लेकर हम दिवाना दिल‌’, ‌‘ये मेरा दिल प्यारका दिवाना‌’, ‌‘ओ हसिना जुल्फोवाली‌’, ‌‘परदे मे रहने दो‌’, ‌‘जब छाये मेरा जादू‌’ अशी मंत्रमुग्ध करणारी तसेच बॉलिवुडचा सुवर्णकाळ दर्शविणारी अनेक सदाबहार गीते यावेळी सादर करण्यात आली. सर्व गायिकांनी एकत्रितपणे सादर केलेल्या ‌‘मौसम मस्ताना‌’ या गाण्याला रसिकांनी विशेष दाद देत सहगायनाचा आनंदही लुटला. आजच्या तरुणाईलाही भावणारी उडत्या चालींची तसेच रिमेक केलेली परंतु आजही मूळ स्वरूपात रसिकांच्या हृदयात असलेली गीते सादर करून कलाकारांनी रसिकांचे मन जिंकले. कार्यक्रमाची सांगता सर्व कलाकारांनी सादर केलेल्या ‌‘जयोस्तुते‌’ या गीताने करण्यात आली.

कलाकारांच्या सादरीकरणाला भरभरून दाद देत रसिकांनी टाळ्या व शिट्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक करत अनेक गाण्यांसाठी वन्समोरची मागणी केली. दिलखेचक गीतांच्या स्वरवर्षावात रसिक चिंब होत असताना सुप्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत यांनी आशा भोसले यांचे अप्रतिम शिल्प साकारत थोर गायिकेला मानवंदना दिली. कार्यक्रमाला लीलाताई तुपे, प्रशांत तुपे, वैशाली तुपे, गायक निखिल हिरुलकर, निवृत्त आयजीपी चंद्रशेखर दैठणकर, भाजपा शहर चिटणीस प्रियांका शेंडगे-शिंदे, आनंद सराफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी केले तर संयोजन अजित कुमठेकर यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय इंगळे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×