Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

खून प्रकरणात मदत करण्यासाठी लाच मागणारा पोलीस हवालदार अटकेत

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – खुन प्रकरणात अटक केलेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी मदत करणे, तसेच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी एका महिलेकडे २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रमेश लक्ष्मण नागटिळक (वय ४२, रा. शारदानगर, माळेगाव, बारामती) याला अटक करण्यात आली. याबाबत एका ४६ वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेच्या मुलाविरुद्ध बारामती परिसरातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या घरापायी चूलत भावाने काढला भावाचा काटा – सविस्तर बातमी

गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या करंजेपुल चौकीचे पोलीस चौकीत पोलीस हवालदार रमेश नागटिळक नियुक्तीस आहे. तक्रारदार महिलेच्या मुलास जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो, तसेच आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी हवालदार नागटिळक आणि चौकीतल उपनिरीक्षकाने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागतिली, अशी तक्रार महिलेने १८ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. नागटिळक याने महिलेकडे तडजोडीत २५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, उपनिरीक्षकाने लाच मागितली नसल्याचे उघडकीस आले. नागटिळक याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलीस हवालदार नागटिळक याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×