Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुण्यात गांजा विक्रीत पोलीस कर्मचारी सामील; कर्मचारी निलंबित

विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या क्रीडा शिक्षकाविरुद्ध गुन्हा

गांजा विक्री प्रकरणात पोलीस कर्मचारीच भागीदार असल्याची धक्कादायक माहिती

marathinews24.com

पुणे – पद्मावती भागात गुन्हे शाखेेने कारवाई करुन पाच किलो गांजा जप्त केल्याची घटना नुकतीच घडली. गांजा विक्री प्रकरणात पोलीस कर्मचारीच भागीदार असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. नवनाथ कांतीराम शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

धक्कादायक…प्रेमाला विरोध केल्याने तरुणाचा खून – सविस्तर बातमी 

शिंदे स्वारगेट पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक खरात, सहायक फौजदार शेख, पोलीस कर्मचारी जामगे आाणि पथक गस्त घालत होते. त्या वेळी पद्मावती भागात प्रतीक आंत्वन पवार याच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पाच किलो २६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. चौकशीत सौरभ कट्टीमणी ऊर्फ पाटील, सागर चव्हाण ऊर्फ डागाभाई, अभिजित सावंत यांनी प्रतीक पवार आणि सॅण्डी ऊर्फ संदीप घोटे यांना गांजा विक्रीसाठी दिल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याात आला. पुणे-सातारा रस्त्यावर सौरभ कट्टीमणी आणि डागा भाई हे गांजा विक्री करत असल्याची महिती मिळाली होती. पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदे त्यांना गांजा विक्री व्यवसायात मदत करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. शिंदे हा सहकारनगर, पद्मावती भागातील बेकायदा धंद्यांना मदत करत असल्याची माहिती मिळाली होती.

गांजा विक्री प्रकरणात ताब्यात घेतलेल्या प्रतीक पवार याची चौकशी केली होती. त्याच्या मोबाइल संचात नवनाथ शिंदे याचा मोबाइल क्रमांक होता. मोबाइल क्रमांकाबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर नवनाथ शिंदे हा सौरभ कट्टीमणीकडून दरमहा पैसे घेत असल्याची माहिती मिळाली. शिंदे याची चौकशी करण्यात आली. शिंदे याचे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असून, त्याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते यांनी दिले.

शहरातील बेकायदा व्यवसाय बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाकडे काणाडोळा करुन अवैध धंदे चालविण्यात येत आहे. अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×