Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात ३१ डिसेंबरच्या पब-पार्ट्या डेंजर झोनमध्ये

पोलीस, उत्पादन शुल्क, अग्निशमककडून झाडाझडतीची गरज; गोव्यातील दुर्घटनेनंतर खबरदारी आवश्यक

marathinews24.com

पुणे – शहरासह उपनगरामंध्ये असलेल्या पब संस्कृतीतील नाइट क्लबची उब वेगाने फोफावत आहे. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह आयटी कंपनीतील तरूण-तरूणींचा विकएंड क्लबमध्येच जात आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आता संबंधित व्यावसायिकांनी ऑफर्सच्या नावाखाली तरूणाईला आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वापरले जात आहे. दुसरीकडे मात्र, सुरक्षिततेच्या दुष्टीकोनातून बहुतांश पब, रेस्टॉरंट, हॉटेल व्यावसायिकांनी नियमांना तिलांजली दिली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेविना फक्त व्यावसायिकात पाहणार्‍यांविरूद्ध अग्निशमक विभाग, पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभागाने वेळीच लक्ष केंद्रीय करणे गरजेचे आहे. तरच आपण गोव्यातील नाईट क्लबमध्ये झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्तीपासून दुर राहणार आहे.

पुणे पोलीस भरतीत ‘एआय’चा वापर – सविस्तर बातमी

नववर्षांच्या अनुषंगाने बंडगार्डन, कोरेगाव पार्क, बाणेर, हिंजवडी, डेक्कन, कोंढव्यासह उपनगरातील पब मालकांसह रेस्टॉरंट मालकांनी कंबर कसली आहे. एकाच दिवसात जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे खेचून व्यावसायिक उदिष्टे गाठण्याचा अनेकांचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही पब चालकांसह रेस्टॉरंट मालकाला घेण-देण नाही. विशेषतः बंडगार्डन परिसरात उभारलेल्या बहुतांश पब, रेस्टॉरंटमध्ये सातत्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याकडे स्थानिक पोलीस, महापालिका विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून अर्थपुर्ण दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच २५ डिसेंबरपासून सुरू होणारी वर्ष संपुष्टीचा माहोल तयार झाला आहे. त्यामुळे अग्निशमक विरोधी यंत्रणा सक्षम आहे का, ग्राहकांना सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग तयार आहे.

आपत्कालीन मार्गाची सोय आहे का, मद्यविक्री करताना नियमांकडे होणारे दुर्लक्ष, महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने खबरदारी यासह असंख्य नियमांबाबत पब चालकांसह रेस्टॉरंट मालकांकडून होणारी एैशी तैशी चिंतादायक आहे.
गोव्यातील नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बहुतांश तरूणांचा समावेश असून, क्लबमधील कामगारांचा हकनाक जीव गेला आहे. पार्टी ऐन रंगात आली असताना अचानकपणे निघालेला धुर, धुंदीतील अनेकांनी मनावर घेतला नाही. क्लब मालकानेही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. त्यानंतर मात्र, संबंधित क्लबमध्ये आपत्कालीन रस्ताच नसल्यामुळे संबंधितांना आगीत आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पुण्यातही नाताळपासून विविध पब, रेस्टॉरंट, उपाहारगृहांमध्ये गर्दी होण्यास सुरुवात होउन नववर्षापर्यंत ती गर्दी वाढत जाते. मात्र, गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पब, रेस्टॉरंट, बार, तसेच उपाहारगृह चालकांसाठी आपत्कालीन उपाय योजना, सुरक्षेसंदर्भात सूचनांचे पालनाचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

बहुतांश नियमांना दिलीय तिलंजली

अनेक पब, रेस्टॉरंट, बारमध्ये प्रवेश करण्यासाठी, तसेच बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. आग किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास ग्राहकांना त्वरित बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध होण्यास अडचणी आहेत. तसेच अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहे का नाही, याची कित्येक महिन्यांपुर्वी झालेली चाचपणी कुचकामी आहे. त्यामुळे अनुचित घटना घडल्यास त्वरित केल्या जाणार्‍या उपाय योजनांबाबत पब, रेस्टॉरंट, बार चालकांची हयगय तरूण ग्राहकांच्या जीवाशी येण्याची शक्यता आहे. त्यातच चिंचोळ्या जागेत असलेल्या आणि नियमबाह्य पद्धतीने पार्ट्यांचे आयोजन करणार्‍या पब चालक-मालकांविरूद्ध पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, महापालिकेने आताच कठोर कारवाई करणे महत्वाचे आहे. अन्यथा अनुचित घटनांचा विचारही न केलेला बरा.

तरूणांनो पार्टीला जाताय, सावधान

तरूणांनो ३१ डिसेंबरला नववर्षांच्या स्वागतासाठी तुम्ही केलेले नियोजन सुरक्षित असलेल्या पबमध्येच करणे आवश्यक आहे. मात्र, ग्रुपकडून गर्दीच्या ठिकाणीच अनेकांना ओढा कायम ठेवला जातो. प्रत्यक्षात त्याठिकाणी ग्राहकांची सुरक्षितता आहे का, याची विचारणा संबंधित प्रशासनाला करा. आपत्कालीन उपाययोजना आहेत का, नियमांचे पालन केले जात आहे का, याची माहितीसह गुगलवरील रेटींग पाहूनच आपल्या पार्ट्यांचे नियोजन करा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×